फलटण शहरासह तालुक्यात मा.खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे मार्गदर्शन खाली एक लाख झाडांचे वृक्षारोपण करणार – अशोकराव जाधव भविष्यातील ग्लोबल वॉर्मिग चा धोका लक्षात घेता लोकसहभागातून वृक्षारोपण करण्याची गरज आहे त्याचाच भाग म्हणून वट पौर्णिमेचा मुहूर्त साधून काळूबाई नगर येथे वडाचे झाड तसेच दत्त मंदीर परीसरात वृक्षारोपण करून त्याची सुरुवात करण्यात आली आहे या पुढे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज माऊली चा पालखी सोहळा फलटण वरून जाताच मा. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे मार्गदर्शना खाली शहर व तालुक्यात एक लाख झाडांचे वृक्षारोपण करण्यात येणार आहे