फलटण दिनांक १५ ( प्रतिनिधी )फलटण – कोरेगांव विधानसभा मतदारसंघातून आगामी निवडणुकीत बौद्ध समाजातील व्यक्तीला उमेदवारी द्या अशी मागणी जोर धरु लागली असून जो पक्ष बौद्ध समाजातील व्यक्तीला उमेदवारी देईल; त्याच्या सोबतच मतदारसंघातील सर्व बौद्ध समाज राहतील असे मत बौद्ध समाजातील सर्वसामान्यांमधून व्यक्त होत आहे.
सन 2009 साली मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघाची निर्मिती झाली आहे. त्यापूर्वी फलटण – खंडाळा विधानसभा मतदारसंघ होता. फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघाची निर्मिती झाल्यापासून हा मतदारसंघ हा अनुसूचित जाती साठी राखीव करण्यात आला आहे. सन 2009 पासून श्रीमंत रामराजे यांच्या नेतृत्वात दीपक चव्हाण हे फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करीत आहेत.
अनुसूचित जातीमध्ये अनेक जातींचा समावेश आहे. त्यामध्ये आता 2024 साली होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आता बौद्ध समाजाचा आमदार करा; अशी मागणी जोर धरू लागली आहे.
2026 साली मतदारसंघाची पुनर्रचना होणार असल्याच्या चर्चा सुद्धा दबक्या आवाजात फलटण – कोरेगाव मतदारसंघात सुरू आहेत. त्यामुळे असे जर झाले तर आता म्हणजेच 2024 साली होणारी ही निवडणूक ही अनुसूचित जातीसाठी राखीव म्हणून शेवटची निवडणूक ठरू शकते.
Back to top button
error: Content is protected !!