फलटण-
आपलं अवघ आयुष्य मानव सेवेला समर्पित नेतृत्व म्हणजे सुभाष भाऊ शिंदे…
भाऊ तुम्हीच खरे आधारवड…..
आपलं अवघ आयुष्य मानव सेवेला समर्पित करून अखंड समाजकारण व राजकारण करणारा सर्वसामान्यांचा भक्कम आधार म्हणजे कै. सुभाषभाऊ शिंदे.
निस्वार्थीपणा, परहितदक्षता असे गुण सध्याच्या राजकारणात जवळजवळ नष्टप्राय असल्यासारखी परिस्थिती असलेल्या काळात त्यांनी निस्वार्थपणे समाजकार्य व राजकारण केले. स्पष्टवक्तपणा व जिद्द हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य होते. के. बी उद्योग समूहाचे विशेषता माझे आणि त्यांचे ऋणानुबंध दीर्घकाळाचे आणि स्नेहाचे होते. के. बी उद्योग समूहाची फलटण येथे स्थापना झाल्यापासून प्रत्येक महत्त्वाच्या नेत्यांशी व राजकारणी मंडळींच्या भेटी सतत होत असतात, परंतु सुभाष भाऊ हे सर्व राजकारणी मंडळींपेक्षा वेगळे व्यक्तिमत्व होते. एखाद्या कार्यकर्त्याला किंवा त्याच्या कुटुंबातील व्यक्तीला कंपनीमध्ये काम लावण्यासाठी पूर्ण आत्मीयतीने त्या कार्यकर्त्याचे काम व्हावे म्हणून निस्वार्थीपणे शेवटपर्यंत प्रयत्न करणारा नेता मी भाऊंच्यामध्ये पाहिला. शिंदेवाडी, खुंटे व फलटण तालुक्यातील स्थानिक युवकांना कंपनीमार्फत रोजगार निर्माण झाला आहे या उदात्त हेतूने ते सतत कंपनीच्या हिताचे बोलायचे. कंपनीला व वैयक्तिक मला त्यांचा प्रचंड आधार होता. कंपनी चालवताना अनेक चांगले वाईट अनुभव असतात पण अडचण आली तर भाऊ स्वतः येणार आणि काय मदत करू म्हणून सतत विचारणार. ते नेहमी पंचक्रोशीतील गावातील गोरगरिबांच्या सुखदुःखात सहभागी असायचे. गावात कोणतेही कार्य असू भाऊंची उपस्थिती प्रथम असणार आणि जाताना शेवटी जाणार. गावातील प्रत्येक कुटुंबाला तेच घरातील प्रमुख वाटणार. माया आणि दानशूरपणा काय असतो तो भाऊंकडे पाहिले की दिसायचा. अशा या थोर व्यक्तिमत्वाला आज आपल्यातून जाऊन एक वर्ष झाले. भाऊंच्या जाण्याने आमच्यासह अनेकांचा आधार हरपला.
शेवटी एवढेच बोलेन असा आधार पुन्हा होणे नाही…!
श्री. सचिन यादव
डायरेक्टर के. बी. उद्योग समूह