Uncategorized

यंदा यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य संमेलनाचे डिसेंबरमध्ये आयोजन

फलटण : महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा फलटण सन 2012 पासून यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य संमेलन सद्गुरु प्रतिष्ठान व श्रीराम एज्युकेशन सोसायटी, फलटण यांच्या सहकार्याने दरवर्षी दि. 25 नोव्हेंबर रोजी करत असते. परंतु यावर्षी नुकतीच पार पडलेली महाराष्ट्र विधानपरिषदेची निवडणूक व अन्य काही अपरिहार्य कारणांमुळे दि. 25 नोव्हेंबर 2024 रोजीचे यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य संमेलन आयोजित केले नसल्याची माहिती महाराष्ट्र साहित्य परिषद फलटण शाखेचे अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ यांनी एका प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.

यावर्षी या संमेलनाचे एक तप पूर्ण होत आहे. परंतु लौकरच डिसेंबर 2024 मध्ये या संमेलनाचे शानदार संयोजन निश्‍चितपणे केले जाईल, असेही रविंद्र बेडकिहाळ यांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close