फलटण ( प्रतिनिधी )कोळकी च्या विकासासाठी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी भरीव निधी दिलेला असून कोळकी चा चेहरा मोहरा बदलण्यासाठी रणजित दादांना पुन्हा निवडून द्या असे आवाहन अॕङ . संदिप कांबळे यांनी केले . माढा लोकसभा मतदार संघांचे भारतीय जनता पार्टी महायुती चे अधिकृत उमेदवार खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचाराचा शुभारंभ बुवासाहेब महाराज मंदिरात श्रीफळ वाढवून करण्यात आला त्यावेळी अॕङ कांबळे बोलत होते. यावेळी माढा लोकसभा मतदारसंघाचे संयोजक जयकुमार शिंदे, सतिश शेङगे , माजी नगरसेवक, सुधीर अहिवळे , वस्ताद चंदन काकङे , विजय येवले , बाळासाहेब काशिद , संदिप नेवसे , संजय निकाळजे , मुन्ना शेख , रणजित जाधव , राजू मारुङा , भाजपचे पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.त्यानंतर कोळकी मध्ये हाऊस टू हाऊस प्रचार करण्यात आला. पुढे बोलताना अॕङ . कांबळे म्हणाले की , खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी कोळकी गावामध्ये जलसंपदा विभागाचे सिंचन भवन उभारण्यासाठी भरीव तरतूद केलेली असून कोळकी मधून होणाऱ्या बायपस रस्त्यामुळे नागरिकांचे जीवनमान उंचविण्यासाठी मदत होणार आहे. नाईकबोमवाङी ला प्रस्तावीत एमआयङीसी होणार असल्यामुळे कोळकी चा विकास होण्यासाठी मदत होणार आहे. भव्य असे विश्रामधाम साठी सुद्धा रणजितसिंह यांनी निधी आणला असल्याचे ही अॕङ . कांबळे यांनी आवर्जून सांगितले .
Back to top button
error: Content is protected !!