राजकिय

खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या प्रचाराचा नातेपुते येथे शुभारंभ

नातेपुते ता.२७
माढा लोकसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्ष व मित्र पक्षाचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचाराचा शुभारंभ नातेपुते येथे आज करण्यात आला.
नातेपुतेच्या बसस्थानकामागील पुरातन श्री गणेश मंदिरात आज चतुर्थी च्या मुहूर्तावर श्रीफळ अर्पण करून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी नातेपुते गावचे माजी सरपंच ,नगरसेवक अॅड .भानुदास राऊत, दादासाहेब उराडे , हनुमंतराव ढालपे ,विजयकुमार उराडे, शहराध्यक्ष देविदास चांगण, नगरसेवक दीपक काळे ,श्री गणेश पागे, प्रवीण काळे, राहुल पद्मन, शशि कल्याणी ,प्रेम देवकाते, रुपेश इंगोले, सतीश बरडकर, देविदास काळे ,जगदीश देशपांडे, देविदास ठोंबरे, वैभव शहा ,महादेव बरडकर ,सावता बोराटे, सूर्यकांत काळे, मंगेश दीक्षित, जयंत बुवा, अभिषेक पिसे, सतीश बोडरे, आकाश बोडरे, राहुल चांगण ,सचिन भोजने, पिनाक माने आदींसह बहुसंख्य युवक तसेच फलटणचे माढा लोकसभा मतदारसंघाचे संयोजक जयकुमार शिंदे , नगरसेवक आणि भारतीय जनता पार्टी चे शहराध्यक्ष अनुप शहा, अमोल सस्ते , नगरसेवक अजय माळवे ,अशोकराव जाधव , सुधीर अहिवळे , डॉ. अनिल श्रीवास्तव आदी मान्यवर उपस्थित होते.
ही निवडणूक गल्लीबोळातील नाही देश रक्षणासाठी, देशहितासाठी मोदींना मतदान करा….
आपल्या तालुक्याला जास्त निधी दिला कुणी… त्या भाजपला मतदान करा…
रेल्वे मार्गासाठी, पालखी महामार्गासाठी निधी दिलेल्या भाजपला मतदान करा…
निरा देवधर प्रकल्पासाठी चार हजार कोटी देणाऱ्या भाजपला मतदान करा…
या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close
13:00