फलटण प्रतिनिधी – फलटण- पंढरपूर रेल्वे मार्गासाठी निधी मिळावा यासाठी माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली व रेल्वेच्या प्रश्नासंदर्भात चर्चा केली व त्यासाठी निधी उपलब्ध करावा अशी मागणी केली.
फलटण-लोणंद रेल्वेमार्ग पूर्ण करून सुरुवातीपासून या लोहमार्ग साठी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी खूप मेहनत घेतली व हा मार्ग यशस्वीपणे सुरूही आहे,त्यानंतर फलटण-बारामती लोहमार्गासाठी अतोनात मेहनत घेत या मार्गाला मंजुरी मिळविली व त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून घेतला व आज ते काम खूप मोठ्या प्रमाणावर व महागतीने सुरू आहे व या कामावर स्वतः माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे बारीक लक्ष असते व फलटण-बारामती हा त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असून या मार्गामुळे केंद्र सरकार व रेल्वे प्रशासनाचे इंधन बचतीसह हजारो किलोमीटर चे टप्पे वाचणार आहेत.
माजी खासदार स्व.हिंदुराव नाईक निंबाळकर यांनी रेल्वेच्या संदर्भात केंद्रात आवाज उठवला होता त्या मुळे आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे प्रयत्नशील असतात व त्यांना स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आत्तापर्यंत खूप सहकार्य केले आहे.
दरम्यान 29 जानेवारी 2025 बुधवार रोजी दिल्ली संसद भवन येथे केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी भेट घेतली व मंजुर असलेल्या फलटण – पंढरपूर रेल्वे मार्गाचे कामाकरीता निधीची तरतूद करा अशी मागणी केली यावेळी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की लवकरच या रेल्वे मार्गाचे कामास सुरुवात करणार असल्याचे आश्वासन माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना दिले आहे.
दिल्ली – रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचेकडे फलटण-बारामती लोहमार्गासाठी निधीची मागणी करताना माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर
Back to top button
error: Content is protected !!