फलटण – स्वतंत्र भारतात लोकशाहीचा पाया रचनारा संविधान दिन हा आपला स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिना इतकाच महत्वाचा दिन आहे. याची जाणीव फलटण तालुक्यात सनी काकडे आणि महादेव आप्पा गायकवाड यांच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक फलटण या ठिकाणाहून संविधान दिन साजरा करुन दिली. फलटण येथे सर्व नागरिकांना सोबत घेऊन संविधानाचे महत्त्व जनजागृती संविधान दिन साजरा करण्याचे गेली 15 वर्षा पासून मोठ्या उत्साहात फलटण येथे साजरा करीत आहेत. या वेळी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक फलटण येथे पोलीस उपविभागीय अधिकारी मा. राहुल धस साहेब यांच्या हस्ते भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्प हार अर्पण करून भारतीय संविधान प्रत वाचन करून संविधान दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला.त्यावेळी उपस्थित उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस, फलटण शहर पोलीस नलवडे, फलटण ग्रामीण पोलीस निरीक्षक सुनील महाडिक, नायब तसीलदार सोनवणे, मा.नगरसेवक सुधीर अहिवळे (चेअरमन) , सनी काकडे, महादेव गायकवाड आप्पा, शालेय विद्यार्थी तसेच सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित मध्ये संविधान दिन साजरा करण्यात आला.
Back to top button
error: Content is protected !!