मुंबई – दरवर्षी संपूर्ण भारतातील पोलीस दलातील उत्कृष्ट तपासाचे कामगिरी बाबत ” केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक” बहाल करुन अशा अधिका-यांचा सन्मान भारत सरकारचे वतीने केला जातो.
यावर्षी ” केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक ” २०२४ हे पदक फलटण उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. राहुल रावसाहेब धस यांना केंद्र सरकारने जाहिर केले आहे. सदरचे पदक हे भारताचे पहिले गृहमंत्री मा. सरदार वल्लभभाई पटेल यांचे स्मृती प्रित्यर्थ उत्कृष्ट तपासाचे कामगिरीबाबत दरवर्षी दिले जाते. श्री. राहुल धस यांचेबरोबर महाराष्ट्रातील एकूण ११ पोलीस अधिकारी यांना सदरचे पदक देवून भारत सरकारने त्यांचा सन्मान केला आहे. सदरचे पदक श्री. राहुल रावसाहेव धस उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण यांना मिळाले बाबत मा. पोलीस अधीक्षक श्री. समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडुकर व जिल्हयातील तसेच फलटण उपविभागतील सर्व अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी श्री. राहुल धस यांचे अभिनंदन केले.
Back to top button
error: Content is protected !!