फलटण – भारत देशाची राज्यघटना तयार झालेला आज हा दिवस सर्वत्र देशांमध्ये आनंद उत्सवामध्ये साजरा होत असून देशातील नागरिकांमध्ये संविधानिक मूल्यांबद्दल आदराची भावना वाढवणे हा संविधान दिनाचा उद्देश आहे. भारतातील विविध धर्म, जाती आणि करोडो लोकसंख्येला एक देश म्हणून एकत्रित करणारी ही राज्यघटना आहे. तिचा गौरव करण्यासाठी हा दिवस प्रत्येक वर्षी साजरा करतात याच उद्देशाने 26 नोव्हेंबर 2024 रोजी
फलटण कोरेगाव मतदार संघाचे नवनियुक्त आमदार सचिन कांबळे पाटील यांनी फलटण येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले त्या वेळी उपस्थित मा. नगरसेवक सुधीर अहिवळे (चेअरमन) , संजय गायकवाड, सनी मोरे, महेश जगताप, विकी बोके, अभिलाश काकडे, बीटी जगताप, लक्ष्मण अहिवाळे, सोनू रणपिसे , सुशांत काकडे , अमित काकडे. व फलटण येथील सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते.
Back to top button
error: Content is protected !!