फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघात ज्येष्ठ पत्रकार प्रा.रमेश तुकाराम आढाव यांच्या रूपाने एक चळवळीतील उमेदवार मिळाला असून फलटण तालुक्याने या उमेदवाराला भरघोस मताने निवडून देण्याचे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले..
फलटण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वाभिमानी पक्ष व परिवर्तन महाशक्तीचे अधिकृत उमेदवार ज्येष्ठ पत्रकार प्राध्यापक रमेश तुकाराम आढाव यांच्या प्रचाराचा नारळ शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते यावेळी संविधान समर्थन समिती स्वाभिमानी शेतकरी संघटना त्याचबरोबर परिवर्तन महाशक्तीचे सर्व नेतेगण कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चळवळीतील कार्यकर्त्याला आम्ही उमेदवारी दिली असून आत्तापर्यंत आम्ही शेतकऱ्यांसाठी मोठा लढा उभारला होता तो लढा उभारत असताना मोठा संघर्ष पाहिला आहे त्याचबरोबर फलटण तालुक्याने ही शेतकरी संघटनेला या अगोदरही मोठी ताकद दिली होती तसेच ताकद प्राध्यापक रमेश आढाव यांना देण्याचे आवाहन शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी यावेळी केले.
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला मताचा अधिकार दिला असून त्या ब्रहस्त्राचा वापर आपण प्राध्यापक रमेश आढाव यांच्या रूपाने करावा कारण प्राध्यापक रमेश आढाव हे पत्रकारिता सामाजिक समाजकारण व दिन दुबळ्यांचे असणारे प्रश्न सोडवण्यामध्ये त्यांनी आत्तापर्यंत आपले आयुष्य वेचले असून अशा या चळवळीतील कार्यकर्त्याला निवडून देण्याचे आव्हान ही यावेळी राजू शेट्टी यांनी केले.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वाभिमानी पक्ष व परिवर्तन महाशक्तीचे अधिकृत उमेदवार प्राध्यापक रमेश आढाव त्याचबरोबर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते धनंजय महामुलकर नितीन यादव यांच्यासह शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकारी त्याचबरोबर संविधान समर्थन समितीचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Back to top button
error: Content is protected !!