फलटण प्रतिनीधी : फलटण तालुक्यातील निंभोरे गावाच्या हद्दीत पालखी महामार्गावरील नवीन उड्डाणपूल शेजारी सख्ख्या बहिण भावाच्या खून झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. सदरच्या घटनेने फलटण तालुक्यात खळबळ उडाली आहे.
घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार, सिकाबाई तुकाराम शिंदे (वय ३०) व सुमित तुकाराम शिंदे (१६) असे खून झालेल्या बहीण भावाचे नाव आहे. दिनांक २५ रोजी शनिवारी सकाळी उघडकीस आली असता ग्रामीण पोलिसांना याबाबत अवगत करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच फलटण ग्रामीण पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस व फलटण ग्रामीण पोलिस निरीक्षक सुनील महाडिक यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास कामी सूचना दिल्या. हा खून कोणी व का केला याचा पोलिस तपास करत आहेत. घटनास्थळी फलटण ग्रामीण पोलिस ठाण्याचे कर्मचारी पंचनामा करण्याची कारवाई करीत आहेत. दोघांचेही मृतदेह फलटण येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून फलटण ग्रामीण पोलिसांचे पथक घटनास्थळी पंचनामा करीत आहेत. फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
Back to top button
error: Content is protected !!