फलटण दिनांक (12 प्रतिनिधी ) फलटण कोरेगाव मतदार संघ अनुसूचित जाती साठी राखीव होऊन 15 वर्षे (3 पंचवार्षिक) झाली या मध्ये आंबेडकरी समाजाचा आमदार अद्याप झाला नाही. या साठी गेल्या महिन्यांभरापासून या वेळी आंबेङकरी समाजाचा आमदार व्हावा. या बाबत चर्चा विविध माध्यमावर होऊ लागली आहे.
या बाबत विचार विनिमय करून निर्णय घेण्यासाठी शनिवार दि. 13 जुलै रोजी सकाळी 11 वा.येथील भारतरत्न ङॉ . बाबासाहेब आंबेडकर स्मृती भवनामध्ये सामाजिक बैठक आयोजित केली आहे या बैठकीत होणाऱ्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी 12 जुलै रोजी निमंत्रक बैठक फलटण येथील शासकीय विश्रामगृहावर संपन्न झाली. या वेळी माजी नगरसेवक विविध पक्ष संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
Back to top button
error: Content is protected !!