फलटण ( प्रतिनिधी )माढा लोकसभा मतदार संघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवार दि. 22 मे रोजी रॉयल पॕलेस सुरवडी ता. फलटण येथे सायंकाळी प्रमुख कार्यकर्त्यांची आढावा बैटक संपन्न झाली. फलटण कोरेगाव विधानसभा मतदार संघात झालेल्या मतदानाचा आढावा घेताना सर्वच्या सर्व कार्यकर्त्यांनी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना चांगले मताधिक्य मिळून विजयाची खात्री झाली असल्याचे सांगितले . सर्वाधिक मताधिक्य मिळविण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी प्रत्येक बुथवर मनापासून काम करुन कमळ या चिन्हाला जास्तीत जास्त मतदान कसे होईल यासाठी प्रयत्न केल्याचे सांगितले .
यावेळी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, जिल्हापरिषदेच्या सदस्या जिजामाला नाईक-निंबाळकर , फलटण तालुक्याचे ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील, फलटण नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते समशेरबहाद्दर नाईक-निंबाळकर , जेष्ठ नेते विलासराव नलवङे , युवा नेते धनंजय साळुंखे पाटील, स्वराज पतसंस्थेचे चेअरमन अमरसिंह नाईक निंबाळकर, निवृत्त सनदी अधिकारी विश्वासराव भोसले, माढा लोकसभा संयोजक जयकुमार शिंदे, नगरसेवक अशोकराव जाधव,अजय माळवे , सुधीर अहिवळे , सचिन अहिवळे , संदिप चोरमले , अजिंक्य बेङके , फिरोज आतार , आबा बेंद्रे , विक्रम भोसले , भाजपा पूर्व मंडल अध्यक्ष पै. बजरंग गावडे, पश्चिम मंडल अध्यक्ष अमोल सस्ते अमोल खराडे ,व महायुतीचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Back to top button
error: Content is protected !!