फलटण (प्रतिनिधी ) प्रचंड मोठे शक्ती प्रदर्शन करीत भारतीय जनता पार्टी महायुतीतर्फे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनसमुदायासमोर बोलताना खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना विक्रमी मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन केले.
माढा लोकसभा मतदारसंघातून महायुतीतर्फे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर झाली असून आज सोलापूर येथे प्रचंड जनसमुदायाच्या साक्षीने खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन आपला उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी माढाचे आमदार बबनराव शिंदे ,करमाळ्याचे आमदार संजयमामा शिंदे, सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील, माण चे आमदार जयकुमार गोरे उपस्थित होते.
उमेदवारी अर्ज दाखल करताना प्रचंड मोठे शक्ती प्रदर्शन करण्यात आले यावेळी सोलापूर लोकसभा मतदारसंघातून महायुतीतर्फे आमदार राम सातपुते यांनी सुद्धा अर्ज दाखल केला उपस्थित जनसमुदायासमोर बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी मतदारसंघात केलेली मोठी विकास कामे पाहता त्यांना कोणत्याही परिस्थितीत विक्रमी मताने निवडून देण्याचे आवाहन केले.
Back to top button
error: Content is protected !!