क्राइम

विडणी खुन प्रकरणी पोलिसांची ‘लाखाची बात’ ; नावही ठेवणार ‘गुप्त’ ; सहकार्य करण्याचे पोलीसांचे आवाहन

फलटण ता. २५ : आळंदी पंढरपूर पालखी महामार्गांवर असणाऱ्या विडणी ता. फलटण गावच्या हद्दीत २५ फाटा येथील एका उसाच्या शेतात सापडलेल्या सडलेल्या व अर्धवट अवस्थेमधील मृतदेह नेमका कोणाचा व हा खुन आहे की नरबळी याबाबत अद्याप कोणतेही धागेदोरे पोलिसांच्या हाथी आले नाहीत. या घटनेबाबत माहिती देणारास सातारा जिल्हा पोलीस दलाच्यावतीने जिल्हा पोलीस अधिक्षक समीर शेख यांनी एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी दिली आहे.

शुक्रवार दि. १७ रोजी सकाळी दहाच्या सुमारास विडणी ता. फलटण गावच्या हद्दीत २५ फाटा येथील प्रदीप महादेव जाधव यांच्या उसाच्या शेतात सडलेल्या व अर्धवट अवस्थेमधील महिलेचा मृतदेह आढळून आला होता. या मृतदेहाच्या परिसरात तेलकट साडी, स्कार्फ, काळी बाहुली, केस, दिव्याची वात, कुंकू, गुलाल, सुरी अशा वस्तूही आढळून आल्याने हा खुन नसून नरबळीचा प्रकार असल्याचा संशय सर्वत्र व्यक्त होत होता. पोलिसांनी हा परिसर पिंजून काढल्यानंतर व सुमारे पंधरा एकर उसाचे क्षेत्र मोकळे केल्यानंतर त्यांना मृतदेहाच्या परिसरात तेलकट साडी, स्कार्फ, काळी बाहुली, केस, दिव्याची वात, कुंकू, गुलाल, सुरी, सत्तूर अशा विविध वस्तू मिळून आल्या होत्या. तसेच सुमारे दोनशे मिटर अंतरावर असलेल्या पाण्याच्या पाटात एक कवटीही आढळून आली होती, त्यामुळे हा प्रकार खुनाचा आहे की नरबळीचा या बाबत सर्वत्र चर्चेला उधाण आले होते. घटनेचे गांभीर्य ओळखून त्याच दिवशी जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, पोलीस उप अधिक्षक राहूल धस यांनी घटनास्थळी भेट देऊन तेथील पाहणी करून मार्गदर्शक सूचना केल्या होत्या.
या घटनेला आज आठवडा उलटून गेल्यानंतरही पोलिसांना या महिलेचा उर्वरित मृतदेह अथवा त्याचे अवशेष मिळून आले नाहीत, त्याच बरोबर सदर मृत महिलेची ओळखही अद्याप त्यांना पटविता आलेली नाही. श्वानाद्वारे तपास केल्यानंतरही फारसे काही हाथी लागले नाही त्यामुळे संबंधित मृत महिलेची ओळख पाठविणे व हा प्रकार खुनाचा की अघोरी कृत्यातून घडलेला नरबळीचा आहे याची उकल करण्याचे जटील आव्हान पोलीस यंत्रणेसमोर आहे. त्यातच आता सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी
या घटनेबाबत माहिती देणारास सातारा जिल्हा पोलीस दलाच्यावतीने एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले असल्याचे व माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल अशी माहिती फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी दिली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close