फलटण दिनांक २१( प्रतिनिधी ) फलटण शहरातील नागरिकांशी थेट संपर्क साधून समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न करण्यासाठी मा. खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर आणि आमदार सचिन पाटील यांनी मुख्याधिकारी व सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत पायी दौरा सुरु केला असून आज त्यांनी सुधारित जलकेंद्र आणि कचरा डेपोची पाहणी करुन प्रशासनास योग्य त्या सुचना दिल्या. मागील बऱ्याच दिवसापासून फलटण शहरातील समस्या प्रलंबित होत्या. या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आज पासून माजी खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांच्यासमवेत आमदार सचिन पाटील यांनी फलटण शहरातील प्रभाग क्रमांक एक ते प्रभाग क्रमांक सहा चा पाहणी दौरा सुरू केला आहे.
यामध्ये सुरुवातीला फलटण शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सुधारित जलकेंद्राला भेट देऊन त्यांची असणारी स्थितीचे अवलोकन करुन फलटण शहरातील नागरिकांना स्वच्छ पाणीपुरवठा सातत्याने कसा करता येईल याबाबत मुख्याधिकारी निखिल मोरे आणि पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्यांबरोबर चर्चा करून प्रशासनाला योग्य त्या सूचना दिल्या. त्यानंतर त्यांनी येथील कचरा डेपोची पाहणी करून नगरपालिका प्रशासनाला याबाबत योग्य माहिती घेऊन सुव्यवस्था राखण्यासाठी सूचना केल्या .
फलटण शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी कचऱ्याचे ढीग वाढलेली जाडी जुडपे मृत अवस्थेतील मोकाट प्राणी तसेच वाहतुकीस अडथळा करून मोकाट प्राणी अपघातास कारणीभूत ठरत होते या सर्व समस्यांना कंटाळलेले फलटणकर नागरिक यांनी मागील आठवड्यात फलटण नगरपालिका येथे प्रशासनासोबत आयोजित केलेल्या बैठकीत आपल्या तक्रारी मांडल्या होत्या.
याची दखल घेऊन आज पासून संपूर्ण शहरात माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार सचिन पाटील यांनी पाहणी दौरा सुरू केला आहे शहरातील रस्त्यांची दुरावस्था उघडी गटारे बंद असलेल्या रोडलाईट याबाबत प्रशासनाला सर्व सूचना देऊन त्या त्वरित अमलात आणून फलटणकर नागरिकांची गैरसोयी थांबावी असे नगरपालिकेच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना सांगण्यात आले.
फलटण शहरातील या पायी दौऱ्यात रणजीत दादा आणि आमदार सचिन पाटील यांच्या समवेत माजी नगरसेवक अशोकराव जाधव , अजय माळवे , सुधीर अहिवळे , झाकिरभाई मणेर, आण्णा घार्गे , ङॉ .प्रविण आगवणे , अभिजित नाईक-निंबाळकर , भाजपचे जिल्हाउपाध्यक्ष संदिप चोरमले , तालुकाध्यक्ष अमोल सस्ते , रणजितसिंह भोसले , सुर्यकांत दोशी , देवा पाटील , रमेश पवार , राहुल पवार , संजय गायकवाड , रियाजभाई इनामदार , बबलू मोमिन , तसेच सामाजिक कार्यकर्ते भाजपाचे पदाधिकारी आणि प्रभागातील नागरिक उपस्थित होते.
Back to top button
error: Content is protected !!