फलटण दिनांक १६ (प्रतिनिधी ) फलटण शहर शिवसेना प्रमुख निलेश तेलखङे यांच्या मागणीला यश आले असून नगरविकास खात्याने ६० लाख रुपयांचा वैशिष्ट्यपूर्ण निधी फलटण नगरपरिषदेच्या कामांसाठी मंजूर केला आहे. कृषीराज कॉलनी मलटण येथील गणपती मंदिराच्या परिसरात सुशोभिकरणाचे कामासाठी २५ लाख रुपये , इंद्रप्रस्थ बाग लोंढे चौक अंतर्भाव कामे करण्यासाठी २५ लाख रुपये तर बारवबाग येथील सिमेंट रस्त्यांचे साठी १० लाख रुपये असा एकुण ६० लाख रुपयांचा निधी वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत मंजूर करण्यात आला आहे. सदर चा निधी शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत दादा जाधव आणि उपजिल्हा प्रमुख सुरेशराव फङतरे यांच्या विशेष सहाय्याने मंजूर करण्यात आला असून मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहे.
Back to top button
error: Content is protected !!