फलटण, दि. ६ (प्रतिनिधी)- भारतीय जनता पार्टीच्या वतीने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून फलटण तालुक्यात मोफत नेत्र तपासणी , चष्मे वाटप , मोफत सायकल,मोफत भांडी किट, लाडकी बहीण यासह विविध योजना राबवल्या असून यापुढे सुद्धा विकासगंगा कायम वाहत राहण्यासाठी रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या विचाराचा आमदार निवङून देण्याचे आवाहन मा. जिल्हापरिषदेच्या सदस्या जिजामाला नाईक-निंबाळकर यांनी केले . फलटण शहर भाजपच्या वतीने माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या नेत्रतपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.शिबीराच्या उदघाटन प्रसंगी जिल्हा परिषद सदस्या अॅड. सौ. जिजामाला नाईक निंबाळकर बोलत होत्या . यावेळी शहराध्यक्ष अनुप शहा , माजी नगरसेवक अजय माळवे, जिल्हाउपाध्यक्ष संदिप चोरमले , वैद्यकीय आघाङीचे अध्यक्ष ङॉ .अनिल श्रीवास्तव , खजिनदार अजिंक्य बेङके यांची प्रमुख उपस्थिती होती . या शिबिरात नागरिकांची नेत्रतपासणी करुन सुमारे २५०० जणांना मोफत चष्मा वाटप करण्यात आले. तर १५० नागरिकांची शस्त्रक्रियेसाठी शिफारस करण्यात आली त्यांच्यावर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
यावेळी सागर शहा तानाजी कदम , राहुल पवार , अनुप पवार , तज्जमूल शेख , सुनिल पवार, रमेश मठपती , रमेश शिंदे , यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
Back to top button
error: Content is protected !!