राजकिय

शरद पवारांनीच फलटण तालुक्याचा विकास खंङीत केला : खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर

फलटण दिनांक १८ ( प्रतिनिधी )शरद पवार यांनी च फलटण तालुक्यातील विकास खंङीत केला.रस्ते , रेल्वे एमआयङीसी असे प्रकल्प रखङवले . याउलट आयटी बारामती ला , मेङिकल कॉलेज बारामती ला , विमानतळ बारामती ला नेले. माझ्या खासदार कीच्या काळात रेल्वे , रस्ते, पाणी आदी कामांसह इतर विकासकामे झाली असून नीरा देवघर , धोमबलकवङी अश्या कुठल्याही प्रकल्पाला केंद्र शासनाने पैसे दिले नाही असे झाले नाही .शरद पवार यांनी बंद केलेले फलटण तालुक्यातील विकासाचे दरवाजे उघङी केली असून परत बंद करायचे आहे का ? असा प्रश्न विचारुन .मी कुणाचे चांगले केले नसेल तर वाईट मुळीच केले नाही. देशाला महासत्ता बनविण्याची ही निवङणूक असल्याचे ही स्पष्ट प्रतिपादन माढा लोकसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे अधिकृत उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हिंगणगाव येथील प्रचार सभेत बोलत होते .
यावेळी जेष्ठ नेते प्रल्हादराव पाटील , माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले, माजी नगरसेवक अजय माळवे , सुधीर अहिवळे , फिरोज आतार , आबा बेंद्रे, युवा नेते धनंजय दादा साळुंखे पाटील, युवा नेते अमरसिंह नाईक निंबाळकर, माढा लोकसभा संघटक जयकुमार शिंदे, साखरवाडी चे सरपंच विक्रमसिंह भोसले, युवा नेते शेखर खरात, शिवसेनेचे नेते विठ्ठलराव गायकवाड, भाजपा फलटण कोरेगाव विधानसभा संयोजक सचिन कांबळे पाटील, भाजपा पश्चिम मंडल अध्यक्ष अमोल सस्ते, तरडगाव जिल्हा परिषद गटातील सर्वसामान्य नागरिक, महायुतीचे प्रमुख कार्यकर्ते व मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना रणजितसिंह नाईक-निंबाळकर म्हणाले की , गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असणारे माढा लोकसभेचे प्रश्न या मागील वर्षात मी विकासपुरुष नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वखाली सोडवले आहेत, कोरोनामध्ये सर्व जग बंद असतानासुद्धा माढ्यात मी स्वतः जातीने लक्ष घालून काम करत होतो सर्व जनतेची कुटुंबाप्रमाणे काळजी घेत होतो. कोरोना नंतर मिळालेल्या मागील अडीच वर्षात मी पिढ्यानं पिढ्यांचा दुष्काळ सोडवण्यासाठी पाणी आणलंय, युवकांना रोजगार दिलाय, सोप्या दळणवळणासाठी चांगले रस्ते आणि रेल्वे दिलीये, आणि महत्वाचं आरोग्यव्यवस्था सुधरवण्याकडे भर दिलाय, पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांच्या माध्यमातून तुमच्या अनेक समस्या सोडवण्यात मी यशस्वी झालोय, परंतु अजूनही न दिसणारे अनेक प्रश्न आहेत व ते सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे आणि त्यासाठीच मला हवीये ती तुमच्या विश्वासाची साथ,
लक्षात ठेवा.कमळाला मत म्हणजे नरेंद्र मोदी जी ना मत
कमळाला मत म्हणजे माढयाच्या विकासाला मत. असे आवाहन खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी केले.होते.गेले २५ /३० वर्षे फलटण तालुक्याची सत्ता भोगणार्या कङून कुठल्याही कार्यकर्त्यांला मानसन्मान मिळाला नाही. ३९०० कोटी रुपयांचा निधी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी आणला असून ही निवङणूक फलटण तालुक्याच्या अस्मितेची निवङणूक असल्याचे प्रतिपादन जेष्ठ नेते प्रल्हादराव पाटील यांनी केले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close