फलटण – दि २२ नोव्हेंबर २०२४ उद्या शनिवार दि. २३ रोजी सकाळी ८ वा फलटण-कोरेगाव विधानसभा निवडणुकीची मतमोजणी शासकीय धान्य गोदाम येथे होणार आहे. मतमोजणी प्रक्रिया पार पाडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून मतमोजणीच्या सुरुवातीला पोस्टल मते मोजली जाणार आहेत. त्यानंतर १४ टेबलवर ईव्हीएम मतांची मोजणी २६ फेऱ्यात होणार आहे. तर पोस्टल मतमोजणीसाठी १० टेबल, इटीपीबीएस मतमोजणीसाठी ५ टेबल अशा २९ टेबलवर मतमोजणी होणार आहे. मतमोजणीसाठी एकूण २५० कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली. फलटण-कोरेगाव मतदार संघामध्ये १ लाख २६ हजार ३६४ पुरुष, १ लाख १५ हजार ००४ स्त्री व ०८ इतर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. एकूण २ लाख ४१ हजार ३७६ एवढे मतदान झाले. मतमोजणीस कडेकोट बंदोबस्तात उद्या सकाळी ८ वा. सुरुवात होणार आहे. ईव्हीएम मशीन वरील मतमोजणीच्या एकूण २६ फेऱ्या होणार आहेत. प्रत्येक फेरीत १४ मतदान केंद्रांची मतमोजणी होणार दुसऱ्या फेरीत १५ ते २८ अशा पद्धतीने २६ फेऱ्यात ३५५ केंद्रांची मतमोजणी होणार आहे. २६ वी फेरी ५ मतदान केंद्राची असेल. प्रत्येक फेरी पूर्ण झाल्यानंतर लगेचच फेरीचा निकाल घोषित केला जाणार आहे.
Back to top button
error: Content is protected !!