राजकिय

पवार साहेब तुम्ही श्रीमंत रामराजेंना आमदार केले तर मग ते तुम्ही फलटण ला आलेवर का शेजारी खुर्चीवर बसले नाहीत – अजितदादा पवार

फलटण – पवार साहेब तुम्ही श्रीमंत रामराजेंना आमदार केले तर मग ते तुम्ही फलटण ला आलेवर का शेजारी खुर्चीवर बसले नाहीत – अजितदादा पवार

तुम्ही आमदार झाला तेव्हा मी तिसरीत होतो,मग मी तुम्हाला कसा आमदार करणार?
फलटण करानो आता तुमची सटकवा अन सचिन पाटील यांना आमदार करा,

श्रीराम कारखान्याचा करार दोनशे रुपये मग तो तीस रुपये कसा मिळतो? कमिन्स बाबत लवकरच बैठक घेऊन कामगारांच्या हक्काचे पैसे मिळवून देणार,एकदा सर्व संस्था माझ्या ताब्यात द्या मग बघतो कसा विकास होत नाही,
फलटण प्रतिनिधी – पवार साहेब तुम्ही म्हणाला की अजित पवार यांनी सांगितले की श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांना आमदार केले,मग तुम्ही केले का?मग तुम्ही फलटण ला आला तुम्ही त्यांचे नेते होता तर मग ते तुमच्या स्टेजवर तुमच्या शेजारी का बसले नाहीत असा मिश्किल टोला लागावत श्रीमंतांच्या चुकीच्या धोरणावर अजित पवारांनी जोरदार हल्ला चढविला, व एकदा सचिन पाटील यांना निवडून द्या मग मी बघतो तुमच्या तालुक्याचा विकास का होत नाही,आमचा गादीला मान आहे,पूर्व वैभव असलेला फलटण तालुका का मागे पडला व तो पडण्यास तुम्हीच जबाबदार आहात असे अजितदादांनी सांगितले.
महायुतीचे उमेदवार सचिन पाटील यांच्या प्रचारनिमित्ताने झालेल्या सांगता सभेत अजितदादा पवार बोलत होते यावेळी माजी खासदार रणजितसिंह नाईक,जेष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील,उमेदवार सचिन पाटील,अ‍ॅड.जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर,बाळासाहेब सोळसकर,श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर,माणिकराव सोनवलकर,उद्योजक राम निंबाळकर,जयकुमार शिंदे,अ‍ॅड.नरसिंह निकम,युवानेते अमरसिंह उर्फ अभिजित नाईक निंबाळकर,रणजितसिंह भोसले(बाबा),अनुप शहा,नानासाहेब उर्फ पिंटू ईवरे,धिरेंद्रराजे खर्डेकर,सरपंच सागर अभंग ,चेतन शिंदे,सौ.प्रतिभाताई शिंदे,विक्रमसिंह भोसले उपस्थित होते.
यावेळी बोलताना अजितदादा यांनी सांगितले की 1995 पासून श्रीमंतांच्या हातात सूत्र आली ते म्हणतील तो आमदार,ते म्हणतील ते नगरपालिकेत नगरसेवक,जिल्हा परिषद व पंचायत समितीला उमेदवार मग फलटण ची एवढी दयनीय अवस्था का झाली एक काळ होता श्रीमंत मालोजीराजे यांनी उभा केलेला फलटण तालुका विकासात अग्रगण्य होता मग तुम्ही त्यात काय भर घातली ते सांगा यापूर्वी अनेक माजी आमदार यांनी चांगली कामे फलटण तालुक्यात केली? श्रीराम कारखाना चालवायला दिला त्याचा करार साखर आयुक्त शेखर गायकवाड व माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या समोर झाला त्यावेळी हा श्रीराम कारखाना चालवायला देण्याची गरज नाही असे सांगितले होते अन जर चालवायला द्यायचा तर फक्त पाच वर्षे द्यावा अशी शिफारस होती,तसेच हा कारखाना 200 रुपये प्रतिटन द्यायचे ठरले मग 30 रुपये कसे मिळतात? मला आज वेळ नाही नाहीतर मी या कराराची चिरफाड केली असती असे अजितदादांनी सांगितले.
श्रीराम कारखान्याची मोक्याची जमीन विकली,कारखाना चालवायला दिला त्यामध्ये नक्कीच काहीतरी गौडबंगाल आहे,असे अजितदादांनी सांगितले यावर नक्कीच पुस्तक लिहले जाईल असा टोला लागावत राजेंच्या कारभाराचे अक्षरशः वाभाडे काढले,तुमच्याच संस्थांना गोडाऊन भाड्याने देण्यापेक्षा त्यात खते विका,तुम्हाला एकदा माझ्याकडे या संस्था चालविण्यासाठी योग्य सल्ला तुम्हाला देऊ,असे अजित पवारांनी सांगितले.
रस्त्यावर सभा घ्यावी लागत आहे,साधे एक पटांगण नाही,पालिकेच्या ठिकाणी सर्वांगीण विकासासाठी जागांवर आरक्षण ठेवायचे असतात,परंतु इथं स्वच्छतागृह नाहीत,जाताजाता मी दीपक चव्हाण यांना 200 कोटी रुपयांचा निधी दिला मग तो कुठ गेला?, कोणी दिला हे तरी एकदा सांगा, तुमची मुलं बारामती ला शिकायला येतात,प्रवासात जाणारा वेळ वाचला तर ते अभ्यास करतील,कुटुंबातील लोकांना वेळ देतील,निरा नदी प्रदूषित कशाने होतेय तर नेत्यांच्या संस्था म्हणजे गोविंद व हेरिटेज डेअरी त्यात घाण सोडतायत,पायाला पाणी लागले तर खाजखाज होतीय,उभी पिके पोग्यातून जळत आहेत.
तुम्ही फलटण- कोरेगाव मतदारसंघात यावी बदल केला तर मी तुमच्या सोबत आहे,मला माजी खा.रणजितसिंह यांचं कौतुक वाटते पडले तरी थांबले नाहीत विकासासाठी झटत राहिले,त्या विकासातून तुमचे नक्कीच भले होणार आहे, फलटण च्या व्यापाऱ्यांनो माझ्याकडे या माझी बाजारपेठ तुम्हाला दाखवतो,अरे तुमचे फलटण पश्चिम महाराष्ट्रातील एक अग्रगण्य शहर व तालुका होता मग मागे का पडला याचा विचार करा,एकदा सचिन ला आमदार करा तुमच्या सर्व संस्था वठणीवर आणतो,यांनी संस्था चालवायला दिल्या हे कुठ पाप फेडतील,कमिन्स मध्ये कामगार रक्ताच पाणी करतो आणि हे पैसे खातात?,लवकरच मॅनेजमेंट ला बोलावणार असून नाईक बोम वाडी येथील एमआयडीसी साठी प्रयत्नशील असून त्या ठिकाणी चांगले उद्योग येथील व दहा हजार युवकांच्या रोजगाराचा प्रश्न सोडवण्यासाठी मी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या बरोबर असेल असे अजितदादांनी सांगितले यावेळी हजारो लोक या सांगता सभेसाठी उपस्थित होते.

चौकट – बदलाचे वारे….
सण 1995 साली माजी आमदार बदलण्याचा फलटण करांनी विढा उचलला होता त्याच पार्श्वभूमीवर आजची सभा फलटण मध्ये दिसली यामुळे नक्कीच बदल होईल अशी चर्चा फलटण मध्ये रंगली होती.

फलटण – येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सचिन पाटील यांच्या सांगता सभेत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार, उपस्थित माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर ,सचिन पाटील व इतर

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close