पुणे पदविधर व शिक्षक मतदार संघाची द्विवार्षिक निवडणूकीच्या अनुषंगाने मद्यविक्री बंद सातारा दि. 21 : पुणे पदविधर व शिक्षक मतदार संघाची द्विवार्षिक निवडणूक मतदान 23 ऑक्टोबर रोजी तर मतमोजणी 27 ऑक्टोबर रोजी होणार आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी मतदानाच्या दिवशी म्हणजेच 23 ऑक्टोबर रोजी व मतदान प्रक्रिया संपेपर्यंत सातारा जिल्ह्यातील सर्व देशी दारु किरकोळ विक्री (सीएल-३) बिअर विक्री परवाने (एफएल/बीआर-२) विदेशी मद्यविक्री (एफएल-२) परवानाकक्ष (एफएल-३) बिअरबार (फॉर्म ई) व ताडी दुकान टीडी-१ या अनुज्ञप्तीची जागा व विक्री पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले आहेत. सदर आदेशाचे कोणत्याही अनुज्ञप्तीधारकाकडून उल्लंघन झाल्यास त्यांचे विरुध्द मद्य निषेध कायदा १९४९ नियमान्वये योग्य ती कडक कारवाई केली जाईल.