राजकियराज्यशैक्षणिकसामाजिक

सत्ता परिवर्तन झाल्यानंतर सुमारे ३० वर्षांनी भरविण्यात आलेल्या जनता दरबाराला ऊत्स्फुर्त प्रतिसाद , संपूर्ण तालुक्यातील जनतेमधून जनता दरबाराचे कौतुक आणि चर्चा

फलटण दिनांक ११ ( प्रतिनिधी )खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली
विविध शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या ‘जनता दरबार’ ला ऊत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला .या जनता दरबारात फलटण तालुक्यातील जनतेच्या अनेक प्रलंबित समस्यांचा जागेवर निपटारा करण्यात आला.


महाराजा मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आलेल्या या जनता दरबारात, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांनी जनतेच्या तक्रारी अर्जांवर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. यावेळी जेष्ठ नेते प्रल्हाद साळुंखे-पाटील,सातारा जिल्हा बॕकेचे संचालक शिवरुपराजे खर्डेकर , उद्योग समूहाचे सर्व्हेसर्वा विलासराव नलवङे , कृष्णा खोरे विकास महामंडळाचे संचालक माणिकराव सोनवलकर , महानंदा चे माजी उपाध्यक्ष ङि.के. पवार ,विश्वासराव भोसले , अॕङ .नरसिंह निकम , जयकुमार शिंदे , गटनेते , अशोकराव जाधव , पुर्व मंडल अध्यक्ष बजरंग गावडे, पश्चिम मंडल अध्यक्ष अमोल सस्ते , शहराध्यक्ष अनुप शहा , नगरसेवक अजय माळवे , सुधीर अहिवळे , जिल्हाउपाध्यक्ष संदिप चोरमले, रणजितसिंह भोसले , अभिजित नाईक-निंबाळकर , अमित भोईटे , विक्रम भोसले , सचिन सस्ते आदींनी प्रमुख उपस्थिती होती . फलटण शहर आणि ग्रामीण पोलीस स्टेशन, भूमी अभिलेख , सार्वजनिक बांधकाम , पंचायत समिती, महावितरण , फलटण नगरपरिषद, महसूल, प्राधिकरण, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय,कृषी विभाग, नीरा उजवा कालवा विभाग,सहाय्यक निबंधक कार्यालय, वन विभाग, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, धोमबलकवडी पाटबंधारे या विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
सत्ता परिवर्तन झाल्यानंतर सुमारे ३० वर्षांनी भरविण्यात आलेल्या या जनता दरबाराची चर्चा संपूर्ण मतदार संघात झाली असून जनतेमधून जनता दरबाराचे कौतुक होत आहे.
तब्बल दहा तास चाललेल्या जनता दरबारात एकूण 15 खात्याअंतर्गत 488 अर्जांवर चर्चा करण्यात आली. यामधील अनेक अर्जदारांचे जागीच विषय सोडवण्यात आले तर काही अर्जांवर लवकरच निकाल देण्यात येणार आहे.
प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्यासहित फलटण पोलीस उपविभागीय अधिकारी राहुल धस, फलटण तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव, फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे सुनील महाडिक, फलटण शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत कुमार शहा, फलटण नगरपालिकेचे मुख्याधिकारी निखिल मोरे आदींसह सर्व विभागाचे शासकीय अधिकारी उपस्थित होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close