राजकिय

सचिन पाटील यांना फलटण शहरातून 70% मताधिक्य भेटेल त्यामध्ये मलठणकरांचा सर्वात मोठा वाटा असेल – मा.खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर कोणत्याही परिस्थितीत सचिन पाटील यांच्या रूपाने विजयाचा गुलाल घेणारच

फलटण- महायुतीचे उमेदवार सचिन पाटील यांच्या विजयाचा गुलाल आपण कोणत्याही परिस्थितीत घेणार असून फलटण शहरातून त्यांना 70 टक्के मताधिक्य भेटेलच पण त्यामध्ये मलटणकरांचा सर्वाधिक मोठा वाटा असेल असा विश्वास माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केला.

राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार सचिन पाटील यांच्या प्रचारार्थ मलठण येथे कोपरा सभेचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर बोलत होते. यावेळी फलटण तालुका संघर्ष समितीचे अध्यक्ष ॲड नरसिंह निकम ,उमेदवार सचिन पाटील, माजी नगरसेवक अशोकराव जाधव,दत्तराज व्हटकर,बाळासाहेब भोसले आदी उपस्थित होते.

गेली अनेक वर्षे आम्ही निवडणूक लढवत आहोत यामध्ये हार जीत होत असली तरी पराभवाने खचून न जाता आम्ही जनतेसाठी प्रत्येक निवडणूक लढविली आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये फलटण शहर व तालुक्याने मोठे मताधिक्य दिले मात्र काही कारणामुळे पराभव झाला असला तरी यातून खचून न जाता फिनिक्स पक्षाप्रमाणे उभारी घेत आपण मोठ्या प्रमाणात निधी फलटण तालुक्यासाठी आणला आहे. फलटण शहर व मलटण मधील प्रत्येक रस्त्याचे कामाला निधी मंजूर असून भविष्यात मलठान मध्ये तर विकासाचे कोणतेच काम वर्षभरात बाकी राहणार नाही असा विश्वास रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केला.
मी खासदार झाल्यानंतर कोरोना परिस्थितीमुळे अनेक मर्यादा आल्या त्यानंतरच्या कालावधीत विरोधकांनी आपल्याला खोट्या केसेस द्वारे अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला मात्र यावर मात करत आपण प्रचंड मोठी विकास कामे मंजूर करून आणली.विकासकामांसाठी मोठे कष्ट घेतले. फलटणला आरटीओ कार्यालय आणले,पोलीस स्टेशन च्या इमारती उभारल्या,नीरा देवघर कालव्यांची कामे सुरू केली. या कारणामुळे देशातल्या टॉप टेन खासदारांमध्ये आपले नाव गणले जात होते. त्यामुळे लोकसभा निवडणूक जाहीर होतात पहिल्या उमेदवारी यादीत आपले नाव आलेले होते. केंद्रीय नेतृत्वाचा तसेच राज्यातील दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा आपल्यावर मोठा विश्वास असून या माध्यमातून तालुक्याचा चेहरा मोहरा बदलणार असल्याची ग्वाही रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली.
आज निरा देवघरचे कालव्यांची कामे सुरू असून फलटण ते बारामती रेल्वे मार्गाचे काम सुरू झालेले आहे लवकरच फलटण ते पंढरपूर रेल्वे मार्गाचे काम सुरू होणार असून तालुक्यातील रस्त्यांसाठी मोठा निधी दिलेला आहे.शहराच्या बाहेरून रिंग रोड करण्याचे काम सुरू झालेले आहे सचिन पाटील यांना आपण उभे केले असून मला जसे फलटण तालुका व शहराने मताधिक्य दिले त्याहून अधिक मताधिक्य त्यांना द्यावे असे आवाहन रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी केले.
सत्ताधारी राजे गटांने नेहमी मलटणकरांकडे दुर्लक्ष केले असून मलठनकराना गावाबाहेर ठेवण्याचे काम त्यांनी केले आहे. मलठनकरानी न खचता आपल्याला नेहमी साथ दिली. आपण मोठ्या प्रमाणात मलटण साठी विकास निधी दिलेला असून लवकरच बारामतीच्या धर्तीवर मलटण आणि फलटणचे विकासाचे वेगळे रूप दिसेल. सचिन पाटील यांच्या विजयात सर्वाधिक मोठा वाटा मलटणकरांचा असेल अशी ग्वाही रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली.यावेळी अशोकराव जाधव, ॲड नरसिंह निकम आदींची भाषणे झाली.सभेसाठी मोठ्या संख्येने नागरीक उपस्थित होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close