फलटण – संविधान समर्थन समिती फलटण पुरस्कृत व परिवर्तन महाशक्तीचे अधिकृत उमेदवार प्रा. रमेश तुकाराम आढाव यांच्या प्रचारार्थ फलटण येथे 17 नोव्हेंबर 2024 रोजी दुपारी २:०० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी जाहीर सभा होणार आहे. अशी माहिती परिवर्तन महाशक्तीकडून देण्यात आली.
यावेळी प्रा. रमेश आढाव म्हणाले की, फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघात आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी प्रचाराच्या निमित्ताने फिरत आहे. मतदार संघात आम्हाला दिवसां दिवसा प्रतिसाद वाढत चाललेला आहे. मतदार संघातील लोकांना परिवर्तन हवे आहे. आणि हे परिवर्तन अटळ आहे. ही लढाई आमच्या राजकीय अस्तित्वाची आहे. मतदार संघात सर्वाधिक आमच्या समाजाचे संख्याबळ आहे. तरीसुद्धा आम्हाला डावल जातय याचा आम्ही विचार करून निवडणुकीत उतरलो आहोत आणि हा विजय निश्चित आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर म्हणाले की, महाविकास व महायुतीचे दोन्ही उमेदवार हे कारखानदारांचे उमेदवार आहेत. ही लढाई कारखानदार विरुद्ध शेतकरी अशी आहे.
कामगार संघर्ष संघटना महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष सनी काकडे बोलताना म्हणाले की, फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघात 68 हजार बौद्ध मतदार आहेत यामधील आम्हाला पन्नास हजार आणि इतर परिवर्तन महाशक्तीचे मताधिक्य मिळवून प्राध्यापक रमेश आढाव विजयी होणार आहेत आहेत . तसेच ते म्हणाले की शिक्षक नको उद्योजक नको तर मतदार संघाला प्राचार्य हवा. प्रा. रमेश आढाव हे दोन्ही उमेदवारापेक्षा सरस आहेत.
सचिन अहिवळे म्हणाले की, ही लढाई आमच्या स्वाभिमानाची आहे आमच्या समाजाच्या अस्मितेची आहे. फलटण कोरेगाव विधानसभेला आम्ही प्रा. रमेश आढाव यांच्या रूपाने तिसरा पर्याय दिलेला आहे. तिसरा पर्याय म्हणून प्रा. रमेश आढाव विजयी होतील.
कपिल काकडे म्हणाले की, गेली पंचवीस वर्ष एक हाती सत्ता आहे, फलटणला लोकल लेवलला आमदार खासदार मिळाले फलटण मागे आहे. मतदार संघात फिरताना आमच्या निदर्शनास आले की, युवक ग्रज्युएट असताना सुद्धा त्यांना गवंडी बिगाऱ्याचे काम करावे लागत आहे. फलटणमध्ये मुलांना रोजगार नाही. यामुळे जनतेने प्रा. रमेश आढाव यांना विजयी करावे.
प्रा. रमेश आढाव यांच्या प्रचारार्थ 17 नोव्हेंबर 2024 च्या जाहीर सभेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.
Back to top button
error: Content is protected !!