राजेगटाला खिंडार पंचायत समितीचे माजी सभापती रामभाऊ ढेकळे यांच्यासह नंदू शेठ नाळे यांचा राष्ट्रवादी मध्ये प्रवेश
फलटण प्रतिनिधी – राष्ट्रवादी काँग्रेसच्या फलटण तालुका अध्यक्षपदी श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर व महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी प्रतिभाताई चेतन शिंदे यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार निवड केली असल्याची माहिती खासदार नितीन काका पाटील यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण तालुक्यात अनेकांनी प्रवेश केला असून आज गुरुवारी दि.30 रोजी झालेल्या जिल्हास्तरीय बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत राज्यसभेचे खासदार तथा सातारा जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष खा.नितीन काका पाटील यांनी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक व फलटण पंचायत समितीचे माजी सभापती युवानेते श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर यांची फलटण तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते स्व.सुभाषराव शिंदे भाऊ यांच्या स्नुषा सौ.प्रतिभाताई चेतन शिंदे यांची महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड केली यावेळी फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन पाटील उपस्थित होते. दरम्यान फलटण-कोरेगाव विधानसभा निवडणुकीत विजयश्री खेचून आणीत माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली आमदार सचिन पाटील हे निवडणूक आले.दरम्यान त्यानंतर शेतकरी पुत्र असलेल्या आमदार सचिन पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार व माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली विधानसभा तसेच तालुकास्तरावर उठावदार काम सुरू केले असून सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्याची भूमिका असून माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली नुकताच जनता दरबार पार पडला यावेळी कित्येक वर्षे प्रलंबित असलेले प्रश्न सुटले त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये अनेकांनी प्रवेश केला त्या मध्ये युवानेते तथा उद्योजक नंदू शेठ नाळे,तर पंचायत समितीचे माजी सभापती व राजेगटाचे जेष्ठ नेते रामभाऊ ढेकळे यांच्यासह अनेकांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला आहे.