बारामती : देशाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या बारामती येथील “गोविंद बाग” या निवासस्थानी फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील “एकच निर्धार; बौद्ध आमदार” नारा देणारे बौद्ध समाजाचे शिष्टमंडळाने ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली आहे. यामध्ये शरद पवार यांनी आपण समाजाच्या सोबत कायम असून आगामी काळामध्ये नक्कीच याबाबत सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन देत फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील सध्याची परिस्थिती जाणून घेतली आहे. यावेळी संविधान समर्थन समिती यांच्या हस्ते जेष्ठ नेते शरद पवार यांचा सत्कार करत आभार मानण्यात आले.
गत काही महिन्यांपासून फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघात “एकच निर्धार; बौद्ध आमदार” अशी घोषणा देत मतदारसंघातील समस्त बौद्ध समाज एकत्रित करण्याचे काम करण्यात आले होते. त्यानंतर मतदारसंघातील प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांना भेटून बौद्ध समाजाची मागणी निदर्शनास आणून दिली होती. त्यानंतर आज गोविंद बाग येथे घेतलेली शरद पवारांची भेट सुद्धा आगामी निवडणुकीत नक्की काय चमत्कार करते? ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Back to top button
error: Content is protected !!