फलटण: फलटण वकील संघ निवडणूक सन २०२६-२०२७ साठीची अंतिम उमेदवार यादी जाहीर झाली असून, यामध्ये ॲड. मेघा आनंदराव अहिवळे यांची उपाध्यक्ष पदावर बिनविरोध निवड झाली आहे. ६ जुलै २०२६ रोजी निवडणूक अधिकाऱ्यांनी अधिकृत अंतिम उमेदवार यादी प्रसिद्ध केली असून, उपाध्यक्ष पदासाठी केवळ त्यांचाच एकमेव अर्ज राहिल्याने त्यांची ही निवड बिनविरोध झाली.
ॲड. मेघा अहिवळे यांच्यासोबतच इतर काही पदांवरही उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे, ती खालीलप्रमाणे: सहसचिव: ॲड. शारदा राजकुमार दिक्षीत खजिनदार: ॲड. शाम सुभाष अहिवळे सदस्य: ॲड. रोहिणी संजय मंडलकर आणि ॲड. चैत्राली दशरथ शिंदे अध्यक्ष व सचिव पदासाठी होणार लढत बिनविरोध निवडी जाहीर झाल्या असल्या तरी अध्यक्ष आणि सचिव या मुख्य पदांसाठी मात्र निवडणूक होणार आहे. अध्यक्ष पद: ॲड. बजरंग शामराव जाधव आणि ॲड. उमेश विजय कदम यांच्यात थेट लढत होईल. सचिव पद: ॲड. अनिरूद्ध संपतराव सस्ते आणि ॲड. रविंद्र जगन्नाथ अहिवळे यांच्यात चुरस पाहायला मिळणार आहे. ही निवडणूक प्रक्रिया मुख्य निवडणूक अधिकारी ॲड. राहुल व्ही. बोराटे, निवडणूक अधिकारी ॲड. सागर एम. सस्ते आणि ॲड. सुनील एन. शिंदे यांच्या देखरेखीखाली पार पडत आहे. उपाध्यक्ष पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल ॲड. मेघा आनंदराव अहिवळे यांच्यावर फलटण वकील संघ व मित्रपरिवाराकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.