फलटण- टाळमृदंगांच्या गजरात, माउलींच्या जयघोषात, पंढरीच्या ओढीने दरमजल करीत निघालेला लाखो वैष्णवांचा मेळा आज ऐतिहासीक आणि प्राचीन फलटण नगरीत विसावला. फलटणकरांच्या वतीने माऊलीचे भव्य स्वागत करण्यात आले.
‘चांदोबाचा लिंब ’येथील वारी सोहळयातील पहीले उभे रिंगण आणि तरडगाव येथील मुक्काम संपवून वारकरी पहाटेपासूनच फलटणच्या दिशेने यायला लागले होते. तरडगाव येथील प्रस्थानानंतर पालखी मार्गावरील काळज येथे सकाळची न्याहारी , निंभोरे येथे दुपारचा नैवेद्य आणि सुरवडी आदी गावोगावचे स्वागत स्विकारुन संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सोहळा लाखो विठठल भक्तांसोबत संध्याकाळी महानुभव पंथीयांच्या आणि जैन धर्मियांच्या दक्षिण काशी असलेल्या ऐतिहासिक फलटण शहरात दाखल झाला. फलटण शहराच्या प्रवेश व्दाराजवळ जिंती नाका येथे सायंकाळी ५ वाजणेच्या दरम्यान पालखी सोहळा येताच माजी खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर,आमदार सचिन पाटील , प्रांताधिकारी प्रियांका आंबेकर , तहसिलदार ङॉ . अभिजित जाधव , मुख्याधिकारी निखिल जाधव व प्रशासन, नागरिकांच्यावतीने स्वागत करण्यात आले. यंदा माऊलींचा नवीन रथ विविध रंगांच्या फुलांनी आकर्षक सजविण्यात आला होता. त्यामुळे पालखी रथ सर्वाचे लक्ष वेधून घेत होता. त्यानंतर माऊलींचा पालखी सोहळा मलटण , सदगुरु हरीबुवा मंदीर, पाचबत्ती चौक मार्गे ऐतिहासीक आणि प्राचिन श्रीराम मंदीराजवळ सायंकाळी ६ वाजणेच्या दरम्यान आल्यानंतर नाईक निंबाळकर देवस्थान ट्रस्ट आणि फलटण संस्थान च्या वतीने माउलीचे स्वागत सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर,माजी जि. प सदस्या श्रीमंत शिवांजलीराजे नाईक निंबाळकर , फलटण पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांनी केले.
पुढे पालखी सोहळा गजानन चौक, क्रांतिसूर्य महात्मा फुले चौक, गिरवी नाका मार्गे विमान तळावर मुक्कामासाठी विसावला.यानतंर पालखी तळावर वारकरी भाविक आजूबाजूच्या गावातून आलेले ग्रामस्थ फलटणचे नागरीक यांच्या उपस्थितीत समाज आरती करण्यात आली नंतर फलटणकरांनी पादुकांच्या दर्शनासाठी भल्या मोठ्या रांगा लावल्या होत्या. आज सकाळी तरडगाव येथील मुक्काम संपवून माउलीचा सोहळा फलटण कड़े मार्गस्थ झाला मोठ्या भक्तिभावाने तरडगावकरांनी माउलीच्या पालखीला निरोप दिला पुढे हा सोहळा काळज येथे दत्त मंदिर येथे सकाळच्या विसाव्यासाठी थांबला येथे ग्रामस्थानी माउलीचे स्वागत करुंन मनोभावे दर्शन घेतले. यानंतर सोहळा सुरवड़ी गावच्या हद्दित येताच माउलीचे स्वागत सरपंच सौ शरयू जितेंद्र साळुंखे पाटील यांनी केले. यावेळी जेष्ठ नेते प्रल्हादराव साळूंखे पाटील , युवानेते धनंजय साळूंखे पाटील सुरवड़ी पंचक्रोशितिल नागरिकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती त्यानंतर वाटेत निंभोरे ,वडजल येथे स्वागताचा स्वीकार करत सोहळा फलटण शहराकडे मार्गस्थ झाला.
गोड तुझे रुप गोड तुझे नामो
देई मज प्रेम सर्वकाळो
विठा माऊली हाच वर देईो
संचोरुणी राही हदयामाजीो
तुका म्हणे काही न मागे आणिको
तुझे पायी सुख सर्व आहे.ाो
या ज्ञानोबा माऊलीं तुकाराम , ज्ञानोबा माऊलीं तुकाराम सह विठठल नामाच्या जयघोषात आज पालखी सोहळा फलटणनगरीत विसावला आहे. फलटण पालिकेच्या वतीने विमानतळावरील पालखीतळावर वीज, पिण्याचे पाणी, मोबाइल, स्वच्छतागृहाची व्यवस्था करण्यात आली आहे. तर पंचायत समितीच्या वतीने आरोग्य पथक, पुरेसा औषधसाठा,पाणी शुद्धीकरण यंत्रणा, मोबाइल आरोग्य पथक, रुग्णवाहिका, पुरेसा धान्य, रॉकेल व गॅस सिंलिंडरचा साठा तसेच चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सोहळ्यातील भाविकांच्या सेवेत फलटणकरांच्यावतीने कोणतीही कमतरता येऊ नये याची खबरदारी नागरिक व प्रशासनाच्या वतीने घेण्यात येत होती . विविध सामाजिक , शैक्षणिक , राजकिय आदी क्षेत्रातील संघटना , विविध गणेशोत्सव मंङळांनी वारकर्यांसाठी खास भोजन , नाष्टा , चहा , पाणी , औषधोपचार , मॉलीश ची सुविधा उपलब्ध करुन दिल्या होत्या . सोहळा रविवार दिनांक 18 जुलै रोजी सातारा जिल्हय़ातील शेवटच्या मुक्कामी बरड येथे पोहचणार आहे. फलटण शहर शिवसेना शिंदेगट च्या वतीने विनामूल्य आरोग्य शिबिर , अल्पोपहार आणि पाणी बॉटल वाटप करण्यात आले. तर लोकनेते हिंदुरावजी नाईक निंबाळकर वारकरी भवन, मलठण येथे वारकरी बंधूंना अल्पोपहार व पाणी बाटली वाटप करण्यात आले.