Screenshot
फलटण : लायन्स क्लब ऑफ फलटणच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही दीपावली सणाचे औचित्य साधून लायन्स मुधोजी चॅरिटेबल हॉस्पिटलमध्ये रुग्णसेवेचे कार्य तत्परतेने व प्रामाणिकपणे करणारे सर्व कर्मचारी, हॉस्पिटल स्टाफ तसेच माळजाई मंदिर व उद्यान परिसराची स्वच्छता व देखभाल करणारे कर्मचारी श्री. विशाल बोबडे यांना दिवाळी फराळ किटचे वाटप करण्यात येणार आहे.
लायन्स क्लबच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत वर्षभर विविध सामाजिक, आरोग्यविषयक व सेवाभावी उपक्रम राबविले जातात. याच भावनेतून हॉस्पिटलमधील रुग्णसेवेसाठी अहोरात्र कार्यरत असणारे कर्मचारी तसेच माळजाई मंदिर परिसराची स्वच्छता व देखभाल करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कार्याचा सन्मान व्हावा, त्यांच्या दिवाळीचा आनंद द्विगुणित व्हावा आणि त्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करता यावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
सदर दिवाळी फराळ किटचे वाटप लायन्स क्लब ऑफ फलटणचे अध्यक्ष लायन श्री. रणजीत बर्गे, सचिव लायन लायन श्री.प्रमोद निंबाळकर व खजिनदार लायन लायन श्री.दिलीप शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येणार आहे.
तरी लायन्स क्लब ऑफ फलटणच्या सर्व सन्माननीय सदस्यांनी उद्या, गुरुवार दिनांक ५ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ठीक ५ वाजता लायन्स सभागृह, माळजाई मंदिर येथे आवर्जून उपस्थित राहावे, ही नम्र विनंती.
लायन्स क्लब ऑफ फलटण
सेवा हीच आमची ओळख!

