फलटण दिनांक 23 ( प्रतिनिधी )सांगली येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत उज्ज्वल यश संपादन करणाऱ्या विजेत्यांचे व सहभागी गुणवंत वकिलांचा फलटण वकील संघाच्या वतीने यथोचित सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. सांगली बार असोसिएशनतर्फे वकील आणि न्यायाधीशांसाठी ‘२ री राज्यस्तरीय रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा २०२६’ आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती मा. अभय एम. थिपसे उपस्थित होते. या स्पर्धे मध्ये महाराष्ट्रातील २२ हून अधिक जिल्ह्यांतील १०० पेक्षा जास्त वकील सहभागी झाले होते. या स्पर्धेत फलटण आणि सातारा वकील संघाच्या खेळाडूंनी अत्यंत उत्कृष्ट कामगिरी करत जिल्ह्याचा गौरव वाढवला आहे. स्पर्धेतील चमकदार कामगिरी: ॲड. पंकज महाले (सरकारी वकील, फलटण): ९ वा क्रमांक (Top 10 मध्ये स्थान)
इतर खेळाडू: ॲड. सुरेंद्र सरतापे, ॲड.(Top 20मध्ये )
ॲड. सागर सस्ते, ॲड. रणजित जाधव, गौरव गोसावी, (Top 30 मध्ये ) ॲड. प्रसाद खिरे आणि ॲड. शाम अहिवळे (Top 50 ) क्रमांकाच्या आत रँक मिळवून उत्कृष्ट गुण प्राप्त केले. फलटण आणि सातारा वकील संघाच्या खेळाडूंच्या एकत्रित चमकदार कामगिरीमुळे सातारा जिल्ह्याने गुणतालिकेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. अभिनंदन व शुभेच्छा संदेश कौतुक आणि हार्दिक अभिनंदन होत आहे. सांगली येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत उत्तुंग यश संपादन करून सातारा जिल्ह्याला प्रथम क्रमांक मिळवून दिल्याबद्दल फलटण वकील संघातील ॲड. सागर सस्ते ,ॲड. रणजित जाधव,ॲड. सुरेंद्र सरतापे, ॲड. गौरव गोसावी, ॲड. प्रसाद खिरे, ॲड. शाम अहिवळे, ॲड. पंकज महाले (सरकारी वकील )आदी सर्व विजेत्यांचे व सहभागी गुणवंत खेळाडूंचे यथोचित सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. बुद्धिमत्ता आणि संयमाच्या जोरावर आपण मिळवलेले हे यश फलटण वकील संघांसाठी अत्यंत अभिमानास्पद असल्याचे प्रतिपादन फलटण वकील संघाच्या उपाध्यक्ष ऍड. मेघा अहिवळे यांनी केले. या कार्यक्रमाचे नियोजन ऍड. मेघा अहिवळे यांच्या सह सह सचिव ऍड. शारदा दीक्षित सदस्य ऍड . रोहिणी भंडलकर यांनी केले आणि कार्यक्रमास वकीलसंघातील सर्व सन्माननीय सदस्य उपस्थित होते यश संपादन करणाऱ्या वकिलांचा सत्कार ऍड.सुजाता माने, ऍड.वीरसेन कदम, ऍड. राहुल कर्णे,ऍड.सुनील शिंदे यांचे हस्ते करणेत आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्र संचालन उपाध्यक्ष ऍड.मेघा अहिवळे यांनी केले आभार अध्यक्ष ऍड. उमेश यादव यांनी मानले