फलटण प्रतिनिधी – फलटण शहरातील बुलेट च्या फट फट आवाजाने त्रस्त झालेल्या नागरिकांना आता पोलीस ऍक्शन मोड वरती आल्याने आता नक्कीच सुटका मिळणार आहे. गेली अनेक दिवस झाले बिना नंबर प्लेट च्या गाड्यानी चोऱ्या तसेच कर्रकश आवाजाने अक्षरशः भीती ने घायाळ केले होते त्यामुळे नागरिक भीतीच्या छायेखाली होते परंतु आता पोलिसांनी ती वाहने थेट जप्त करीत आरटीओ ला तपासणी करीत त्या वाहनांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली असून आता बिना नंबर प्लेट व फट आवाजाच्या बुलेट ला नक्कीच चाप बसणार आहे.
चौकट – एक नगरसेवक बुलेट तसेच बिना नंबर प्लेट ची वाहने सोडा असे पोलीस अधिकाऱ्यांना फोन करून सांगत आहे,तो स्वतःला मोठा नेता असल्याचे भासवत आहे त्याने जर आता कारवाई करू नका असा फोन केला तर त्याचे नाव व त्याचे उद्योग सर्व पत्रकार बाहेर काढणार आहेत.