फलटण नगरपालिका क्षेत्रातील विशिष्ट नागरी सेवा सुविधा अंतर्गत विविध विकासकामासठी शासनाने ५ कोटी रुपये मंजुर केले आहेत मी व आमदार सचिन पाटील यांनी शहरातील विविध विकास कामांसाठी सातत्याने पाठपुरावा करीत आहेत.फलटण शहरातील रस्ते, गटर , पिण्याचे पाईप लाईन,व प्रभागातील परिसर विकसित करणे ही कामे यातुन केली जातील या पुर्वी ही शहरासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे त्याची निविदा प्रक्रिया सुरू आहे त्यामुळे सर्व कामे लवकरच सुरू होतील.. शहर लोकांना बदलताना दिसेल..जनतेने आमच्या वर विश्वास टाकला आहे तो सार्थ केल्या शिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही असे ही रणजितसिह नाईक निंबाळकर यांनी सांगितले.