फलटण – फलटण पंचायत समिती सभापती निवडीच्या पार्श्वभूमीवर शेवटच्या क्षणी मोठा राजकीय ट्विस्ट पाहायला मिळाला. सभापती निवडीला अवघी काही मिनिटे शिल्लक असतानाच राजकीय घडामोडींना अचानक वेग आला आणि फलटणच्या राजकारणात चर्चांना उधाण आले.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा गट) चे तालुकाध्यक्ष श्रीमंत शिवरूपराजे निंबाळकर आणि भाजपचे ज्येष्ठ नेते तसेच फलटण नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष श्री. दिलीपसिंह भोसले हे अचानक शिवसेना नेते श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानी दाखल झाले. सभापती निवडीला अवघे काही मिनिटे बाकी असताना झालेल्या या भेटीमुळे फलटणच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
या भेटीत सभापती निवडीसंदर्भात महत्त्वाची चर्चा झाल्याची शक्यता व्यक्त केली जात असून फलटण पंचायत समितीतील पुढील राजकीय समीकरणांबाबत अनेक तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.
दरम्यान, सभापतीपदाच्या निवडीवर कोणाचा शिक्का मोर्तब होणार आणि या अचानक घडलेल्या हालचालींचा निकालावर काय परिणाम होणार, याकडे संपूर्ण फलटणकरांचे लक्ष लागले आहे