ढवळ फटी परिसरात एका युवकाचा खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पहाटे सुमारे २ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १० ते १५ जणांच्या जमावाने मिळून हे कृत्य केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तसेच प्रेमप्रकरणातून हा खून झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मृत युवक हा मिरच्यावाडी येथील रहिवासी असल्याचे समजते. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
घटनेनंतर संबंधित आरोपी फरार झाले असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे. घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास पोलिस करत आहेत.
या प्रकरणामुळे पुन्हा एकदा वाढत्या गुन्हेगारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, पोलिस प्रशासनावर आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याचा दबाव वाढत आहे.