फलटण शहरात रिलायन्स कंपनीने ऑप्टिकल फायबर केबल टाकताना मंजुरीपेक्षा अधिक काम केले असून रस्त्याची, पूलाची नासधूस केली आहे. केलेल्या कामाचा दर्जा सुद्धा सुमार आहे. कारवाई करण्याची नागरिकांची मागणी
फलटण दिनांक १९ (प्रतिनिधी )फलटण शहरात रिलायन्स कंपनीच्या ऑप्टिकल फायबर केबल टाकण्याचे काम सुरू असून या कंपनीने नियमांची पायमल्ली करत मंजुरीपेक्षा अधिक रस्ते खोदले असून कामाचा दर्जा सुद्धा सुमार आहे . रस्त्यांची , पुलांची नासधुस करील सरकारचे नुकसान केले असून या कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी फलटणकर नागरिकांमधून होत आहे.
फलटण नगरपालिका क्षेत्रात रिलायन्स कंपनीच्या ऑप्टिकल फायबर केबल टाकण्याचे काम सुरू असून यासाठी रस्ते खोदले जात आहेत. यासाठी संबधित कंपनीने नगरपालिकेची परवानगी घेतली असली तरी प्रत्यक्षात या कंपनीने पालिकेकडून आखून दिलेल्या नियम अटी आणि शर्थींची पायमल्ली करून परवानगीपेक्षा जास्त अंतराच्या रस्त्यावर खोदकाम केले आहे. पालिकेने संबधित कंपनीला ४४५० मीटरचे रस्ते खोदण्याची परवानगी दिली होती. मात्र कंपनीने सर्व नियम धाब्यावर बसवत काम ज्यास्त केले असून फलटण शहरात खोदलेल्या रस्त्याची, पूलाची नासधूस करत सरकारचे नुकसान या कंपनी ने केलेले आहे. तसेच बांधण्यात आलेले चेंबर सुद्धा निकृष्ट दर्जाचे बांधले आहेत. पूलावरून केबल नेताना पूलाचे नुकसान केलेले आहे. या कंपनीकडून नासधूस सुरू असून या कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी फलटणकर नागरिकांमधून होत आहे.