फलटण प्रतिनिधी -गुणवंत विद्यार्थ्यांना भारत देशातील सर्वोत्कृष्ट संस्था इस्रो सहलीचा अनुभव दिला जातो यामध्ये तावडी ता. फलटण येथील रुद्रप्रताप रोहिणी रणजित निंबाळकर याची निवड झाली आहे.रुद्रप्रताप रोहिणी रणजित निंबाळकर हा तावडी गावचा रहिवासी असून इयत्ता पहिलीपासून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतून शिक्षण घेत आहे.गतवर्षी भारत टॅलेंट सर्च (BTS) नावाच्या स्पर्धा परीक्षेमध्ये इयत्ता तिसरीमध्ये तो महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला होता.याच संस्थेमार्फत प्रत्येक इयत्तेतून तीन क्रमांक काढून त्या गुणवंत विद्यार्थ्यांना भारत देशातील सर्वोत्कृष्ट संस्था इस्रो सहलीचा अनुभव दिला जातो;विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना बळ देण्यासाठी ही संस्था खूप छान कार्य करत आहे.रुद्र प्रतापच्या या यशाबद्दल फलटण तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी संकपाळ सर्व विस्तार अधिकारी व सर्व केंद्रप्रमुख यांनी त्याचे अभिनंदन केले व पुढील भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या असून त्याच्या या कामगिरीने फलटण तालुक्याचे नाव सुवर्णाक्षराने नोंदले जाणार आहे.