फलटण-सायंकाळच्या प्रहरात फलटण शहरात लहानांपासून वयोवृद्धांपर्यंत पारंपरिक पद्धतीने दांडिया नृत्याचा व गरब्याचा आनंद महिलांनी मनमुराद घेतला निमित्त होते दांडिया रास स्पर्धा 2025 या कार्यक्रमाचे. फलटण येथील स्वयंसिद्धा महिला उदयोग समूहाच्या वतीने महाराजा मंगल कार्यालयात दांडिया स्पर्धेचे चे आयोजन करण्यात आले होते. याचा शुभारंभ सौ.गौरीताई पाटिल, स्वयंसिद्धा महिला संस्था समूहाच्या अध्यक्षा अँड.सौ.मधुबाला भोसले, सौ.सुजाता यादव सौ. शिवांगी बोरावके, सौ. प्रतिभाताई शिंदे, सौ. काजल भोईटे, स्वयंसिध्दा च्या संचालिका आदी मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. हिंदी मराठी गीतांवर विद्यूत रोषणाईने सजविलेल्या स्टेजवर मुलींनी, महिलांनी गरबा व दांडिया नृत्याचा आनंद घेतला. यावेळी पारंपरिक घागरा, चोळीच्या वेशात वेगवेगळ्या दांडिया ग्रुपने लयबद्ध अदाकारी ठेक्यावर नृत्य करीत उपस्थितांची मने जिंकली तर शहराच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या महिलांनी नेहमीच्या संसारिक जबाबदाऱ्या बाजूला ठेवून मनसोक्तपणे दांडियाचा आनंद लुटला. विजेत्या दांडिया ग्रुप ला मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वाटप करुण सन्मानित करण्यात आले. . खास आकर्षण म्हणून अभिनेत्री सोशल मीडिया इन्फ्लुएंजर सानिका भोईटे उपस्थित होत्या. स्पर्धा परिक्षक म्हणून मलाबार गोल्ड अँड डायमंड बारामती चे रोहीत अवूदे, सौ. चैत्राली उबाळे यांनी कामकाज पाहिले . स्वयंसिद्धा च्या संचालिका सौ. प्रियदर्शनी भोसले यांनी स्वागत केले व आभार मानले.
फोटो कॅप्शन __बक्षीस वितरण करताना सानिका भोईटे अँड.सौ.मधुबाला भोसले,प्रियदर्शनी भोसले व इतर