फलटण आयुष सुधीर अहिवळे….. फलटण नगरपालिका नगराध्यक्ष पदाचे खुले आरक्षण पडल्याने सर्वसामान्य लोकांचे नेतृत्व असलेले युवा नेते तथा पालिकेचे विरोधी पक्षनेता पदी असताना दैदीप्यमान कामगिरी करीत शहरावासियांचा लाडका नेता असलेले समशेरसिंह हिंदुराव नाईक निंबाळकर यांच्या बाजूने सर्वच नेतेमंडळी व नागरिकांनी त्यांच्या नावास 100% पसंती दिली असून आपल्या हक्काचा माणूस आता नगराध्यक्षपदी विराजमान होणार व शहराचा विकास होऊन कायापालट होईल याची खात्री देत आहे.
गेली अनेक वर्षे फलटण पालिकेत विरोधी बाकावर बसून सुद्धा सत्ताधारी असो किंवा विरोधी गटाचा माणूस असो त्याची अस्थेवाईक पणे विचारपूस करणार त्याच काम चुटकीशीरशी मार्गी लावणार त्याच्या सुख दुःखात सतत त्याला साथ देणारे हुशार व तरुणांची मोठी फौज असलेले युवानेते समशेरसिंह हिंदुराव नाईक निंबाळकर यांच्या पाठीमागे शहरातील लोकांची पसंती असून त्यांचा विजय निश्चित होईल व तोही मोठ्या फरकाने होणार असल्याचे फलटणकर यांना विश्वास आहे.