आज हिंगणगाव व तारडगाव येथील विविध रस्त्यांचे भूमिपूजन माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व लोकप्रिय आमदार सचिन पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. १)हिंगणगाव-अदर्की बू ते हिंगणगाव पांढरेची वस्ती रस्ता (५ कोटी ) २)तरडगाव- तरडगाव ते सुळ वस्ती रस्ता (५ कोटी) या दोन्ही रस्त्यांना एकूण १० कोटी रुपये इतका निधी मंजूर झाला असून त्याचे काम आजपासून सुरू झाले. यावेळी मा खा रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले तालुक्यात सर्वत्र गुणवत्ता असलेले रस्त्यांचे जाळे निर्माण करणार असून त्यासाठी आवश्यक निधी महायुती सरकारच्या माध्यमातून उपलब्ध केला जाईल. यावेळी युवा नेते अमरसिंह नाईक निंबाळकर, माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले, विलासराव नलवडे, राजाभाऊ काकडे, किरण जाधव, सुरेश भोईटे, अतुल गायकवाड, आदित्य गायकवाड, किरण जाधव, प्रशांत गायकवाड, रमेश भोईटे, अमित रणवरे, शुभम नलवडे , सचिन पोळ, संतोष सुळ, बापू निंबाळकर, दत्तराज नाईक निंबाळकर यांसह गावातील ग्रामस्थ व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.