मला शिव्या घाला किंवा गचुऱ्याला धरा मी तुम्हाला एकही अर्वाच्य शब्द बोलणार नाही – माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांना काढला चिमटा
फलटण प्रतिनिधी – मला शिव्या घाला किंवा गचुऱ्याला धरा मी तुम्हाला एकही अर्वाच्य शब्द वापरणार नाही असा चिमटा माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांना काढला.
नुकतेच कोळकी तालुका फलटण येथील सभेत विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या वाय प्लस सुरक्षे बाबत मोठे विधान केले होते की धमक्या मला आणि सुरक्षा यांना यावरून माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांना आवर्जून सांगितले की मी फलटण तालुका जिल्हा करण्याच्या उद्दिष्टाने विकास कामे करत आहे, तसेच तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करीत आहे यासाठी राज्य व केंद्र सरकार च्या माध्यमातून मी कोट्यवधी रुपयांचा निधी फलटण तालुक्यासाठी आणला नवीन कॅनॉल तयार करणे तसेच राष्ट्रीय व राज्य मार्ग तयार करणे त्याचबरोबर इतर सुविधा प्राप्त करून फलटण तालुका जिल्हा होण्यासाठी मी प्रयत्न करीत असताना विकासावर बोलण्याऐवजी माझ्यावर वैयक्तिक टिका टिपणी विरोधकांकडून केली जात आहे.हे दुर्दैव असून त्यांना विकास करता आला नाही,मी तालुका विकासाच्या दृष्टीने पुढे नेत असताना यांचा प्रत्येक कामात खोडा घालण्याचा प्रयत्न असून त्यांना विकास खुपत आहे. मात्र मी विरोधकांना एवढेच सांगू इच्छितो की फलटण तालुका विकासा च्या उंबरठ्यावर असून जिल्ह्यात ज्या सुविधा असतात त्या सुविधा मी फलटणमध्ये करीत असून यासाठी केंद्रातून व राज्यातून कोट्यवधी रुपयांचा निधी खेचून आणत आहे मात्र विरोधक हे विकासावर बोलण्यापेक्षा माझ्या वैयक्तिक आयुष्यावर बोलत आहेत मात्र मी त्यांना एवढेच सांगतो की मला शिव्या घाला ग सूर्याला धरा मी तुम्हाला एकही अर्वाच्य शब्द बोलणार नाही असे खडे बोल विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांना सुनावले आहेत.