फलटण मध्ये रविवार दिनांक २६ रोजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते शेकडो कोटींच्या कामाचा शुभारंभ :
येणाऱ्या नगरपरिषद आणि पंचायत समिती जिल्हापरिषद निवङणूकांमध्ये राजे गटाचा सुफङासाफ होणार : मा. खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर फलटण दिनांक २५ (प्रतिनिधी) मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडवणीस यांच्या हस्ते फलटण शहर आणि तालुक्यातील शेकडो कोटींच्या विविध विकास कामांचे लोकार्पण , उदघाटन आणि भूमीपुजन समारंभाचे आयोजन रविवार दि. २६ ऑक्टोबर२०२५ रोजी सकाळी १० वाजता करण्यात आले असल्याची माहीती मा. खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी दिली . यावेळी फलटण नगरपालिका आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका च्या पार्श्वभूमीवर भव्य सभेचे आयोजन सुद्धा करण्यात आले आहे.
निरा- देवघर प्रकल्पातून उतरवलेली खंडाळा धोम बलकवडी कालवा जोड प्रकल्पांतर्गत बंद पाईपलाईनद्वारे योजनेचे उद्घाटन व लोकार्पण आणि त्यापुढील टप्प्याचे भूमिपूजन , नाईकबोमवाडी एमआयडीसीच्या माध्यमातून हजारोंच्या भविष्याचे दालन खुले करणार असून यावेळी विविध कंपन्यांचे प्रमुख उद्योगपतींच्या उपस्थितीमध्ये महत्वपूर्ण पाहणी व आढावा बैठक होणार आहे. याशिवाय दहिवडी – फलटण रस्त्याचे भूमिपूजन , फलटण नगरपालिका क्षेत्रातील रस्त्यांचे उद्घाटने , फलटण शहर आणि ग्रामीण पोलीस ठाण्याच्या इमारती चे उद्घाटने , १०० कोटीची महसूल अंतर्गत प्रशासकीय इमारत व अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालयाचे भूमिपूजन , बारामती प्रमाणे फलटणमधून वाहणाऱ्या निरा उजव्या कालव्याचे सुशोभिकरण प्रकल्प , फलटणमधील ८५ कोटीच्या काँक्रीट रिंग रोङचे उदघाटन , सेशन कोर्ट , महसूल भवन इत्यादी अनेक कामांचे भूमिपूजन व उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. फलटणचा भविष्यकाळ व विकास कसा असेल, हे प्रत्यक्ष अनुभवायचे असेल तर, ते मुख्यमंत्री महोदयांच्या या कार्यक्रमातून समजणार असून या कार्यक्रमानंतर येणाऱ्या नगरपरिषद आणि पंचायत समिती जिल्हापरिषद निवङणूकांमध्ये विरोधी गटाचा सुफङासाफ होणार असल्याचा टोला लगावून सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहान मा. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केले आहे.
आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या दौऱ्याला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. संपूर्ण सातारा जिल्ह्याचे लक्ष या दौऱ्याकडे लागले आहे.
फडणवीस यांच्या दौर्यात मंजूर झालेली व पूर्णत्वास आलेली विकासकामे केंद्रस्थानी असणार आहेत. या प्रकल्पांमुळे मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत असून या कार्यक्रमांच्या निमित्ताने भाजप कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करून आगार नगरपरिषद आणि पंचायत समिती , जिल्हापरिषद निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ च फोडण्यात येणार असून
या दौऱ्यादरम्यान भाजपमध्ये काही नव्या चेहऱ्यांचा प्रवेश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही प्रमुख नेते आणि कार्यकर्ते भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा दौरा राजकीय घडामोडींनाही गती देणारा ठरण्याची चिन्हे आहेत.
तसेच, मुख्यमंत्री फडणवीस फलटण तालुक्यासाठी विशेष घोषणा करणार का, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. तालुक्याच्या विकासासाठी नव्या प्रकल्पांची किंवा निधीच्या घोषणांची शक्यता असून, त्याचा थेट परिणाम आगामी निवडणुकांवर होऊ शकतो, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

