फलटण तालुक्यात भाजप व राष्ट्रवादी ची युती कोळकी, विडणी व हिंगणगाव येथे होणार हाय होल्टेज लढती, यावेळी प्रथमतः च दोन्ही नाईक निंबाळकर घराण्यातील उमेदवारनाहीत. आठ जिल्हा परिषदेसाठी 63 तर सोळा पंचायत समितीसाठी 119 असे एकूण 182 उमेदवारी अर्ज दाखल
फलटण ( प्रतिनिधी ) जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आजच्या शेवटच्या दिवशी कोळकी गटातून अचानक घडामोडी घडत नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केलेले सह्याद्री चिमणराव कदम यांनी कोळकी गटातून जिल्हा परिषदेला उमेदवारी मिळणार नसल्याने शिवसेनेत प्रवेश करीत ऐनवेळी उमेदवारी मिळवली, फलटण तालुक्यातील एकमेव खुला गट असलेल्या कोळकी गटातून अनेक चर्चानां उधाण आले होते की या ठिकाणी जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर विरुद्ध संजीवराजे किंवा शिवांजलीराजे नाईक निंबाळकर अशी दोन्ही घराण्यातील व्यक्तींमध्ये लढत होईल मात्र रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी भाजपचे जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे यांना तर रामराजे नाईक निंबाळकर अर्थात शिवसेनेने सह्याद्री कदम यांना उमेदवारी दिली आहे.
शेवटच्या क्षणी अनेक ठिकाणी सर्वच पक्षांतील उमेदवारांनी बंडखोरी केली असून आता सर्वांच्या नजरा माघारी कोण कोण घेणार या कडे लागल्या आहेत. ही लढत भाजपा व शिवसेना या दोन पक्षातच होणार असली तरी तिसऱी आघाडी करीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, शिवसेना उबाठा गट अन रासपने वंचित बहुजन आघाडी यांनी चुरसीने अनेक ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत. जिल्हा परिषद गट तरडगाव ६,साखरवाडी ६,विडणी ७,गुणवरे ७ बरड १२,कोळकी ८,वाठार निंबाळकर १२ ,हिंगणगाव ५, असे एकूण ६३ अर्ज प्राप्त झाले आहेत. दरम्यान गण पाडेगाव ६,तरडगाव ४ साखरवाडी ९,सस्तेवाडी १४,सांगवी ४,विडणी १५,गुणवरे ६ ,आसू ६,बरड ८,दुधेबावी ७ कोळकी ६,जाधववाडी ४ वाठार निं, १०,सुरवडी ११,सासवड ६ हिंगणगाव ३ असे एकूण ११९ अर्ज प्राप्त झाले आहेत.अर्ज दाखल करत असताना जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले. यावेळी मोटार फेरी, पदयात्रा काढत बँड व पारंपारिक खेळ, लेझीम, हलगी, तुतारीच्या पथकाने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. त्यामुळे फलटण शहरासह सिटी बिल्डिंग परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने यात्रेचे स्वरूप आले होते.