फलटण -फलटण शहरातील अवैध्य दारुचे गुत्ते 1जानेवारी पर्यंत बंद न झालेस दि २६ जानेवारी २०२६ रोजी आत्मदहन करणार असल्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते संग्राम अहिवळे यांनी दिला आहे. या बाबत त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,फलटण शहर पोलिस स्टेशन हद्दीत बेकायदेशिर दारु विक्रि होत असुन कित्येक महिलांचे संसार यामुळे उध्वस्थ होत आहेत. त्यांची मुल अनाथ होउन देशोधडिला लागत आहेत. या अवैध्य दारु विक्रि मुळे गुंडगिरी वाढत चललेली आहे. त्यामुळे हे सर्व रोखण काळाची गरज बनलेली आहे.
तरी येणाऱ्या १ जानेवारी २०२६ पासुन नविन वर्षात हे दारु व्यवसायाचे गुत्ते बंद करावेत,जर दि १ जानेवारी रोजी दारु गुत्ते बंद न झाल्यास २६ जानेवारी २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय सातारा येथे आत्मदहन असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
या निवेदनची प्रत, मा. पालकमंत्री महोदय, सातारा जिल्हा. मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर, मा. जिल्हाधिकारी , सातारा मा. जिल्हा पोलीस अधिक्षक,सातारा यांना दिली आहे.

