फलटण प्रतिनिधी – प्रत्येक ठिकाणी एक शकुनी मामा असतो तसा तुमच्या इथ पण आहे त्यामुळे प्रत्येक गोष्टीत राजकारण करून आपली राजकीय पोळी भाजणाऱ्या तो शकुनी मामा त्या डॉक्टर युवतीच्या मृत्यूप्रकरणात राजकारण करीत असल्याचा गंभीर आरोप करीत आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे नाव न घेता जोरदार टीकास्त्र ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केले.
त्या डॉक्टर युवतीच्या मृत्यूप्रकरणात माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांचा कुठंही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध नसताना रणजीत दादा व सचिन पाटील यांच्या वर कुरघोडी केली जात असल्याचे मंत्री गोरे यांनी स्पष्ट केले,फलटण येथील मेळाव्यात गोरे बोलत होते यावेळी त्यांनी सांगितले की मराठवाडा ते विदर्भ असेल किंवा इतर राज्यात कुठेही शेतकऱ्यांना शेतीला पाणी नाही तिथं पाणी देणारे आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असून आता त्याचं राजकारण संपल्याने व काहीच उद्योग नसल्यामुळे आरोप करीत सुटले आहेत मला मुख्यमंत्री यांनी सांगितले आहे की जरा सबुरीने घ्या पण हा माणूस काय कुरघोडीच राजकारण करण्यापासून थांबत नाही त्यामुळे मी बोलणारच असे गोरेनी सांगीतले. आम्ही त्यांच्याबरोबर तब्बल 20 वर्षे संघर्ष केला आहे, रणजितदादांचा तो दिवस आठवतो लोकसभेत पराभव झाला मी भेटायला आलो दोघांच्या ही डोळ्यात पाणी होत,परंतु आम्ही ठरवलं उद्यापासून कामाला लागायचं हे धुऊन काढायचा आहे तिसऱ्या दिवशी कामाला सुरुवात केली विधानसभा निवडणुकीत आमदार सचिन पाटील निवडून आले, अन या फलटण तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना स्वातंत्र्य मिळाले,आम्ही राजकारण करीत असताना दुष्काळ मुक्ती साठी लढत राहिलो स्व. माजी खासदार हिंदुराव नाईक निंबाळकर यांनी सुरुवात केलेल्या कामाला आज यश आले त्याचं स्वप्न माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पूर्ण केले असे गोरे यांनी स्पष्ट केले. जलसंपदा खाते फलटण मध्ये असताना या जनतेला पाण्यापासून वंचित ठेवले परंतु तुमच्या मुळे न्याय मिळाला असे फडणवीस यांना सांगितले,हे काम पूर्ण झाले नसते दुष्काळी भागात पाणी आले नसते,यासाठी प्रचंड रणजितदादा यांनी संघर्ष केला,सघर्षातून मिळालेला विजय मोठा असतो असेही गोरेनी सांगीतले,मी चार वेळा आमदार झालो राज्याचा ग्रामविकास मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली ती मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्यामुळे,तुम्ही राजाश्रय दिला नसता तर आम्हाला या शकुनी मामाने खूप राजकीय त्रास दिला असता.
फलटण मध्ये या मृत्यू प्रकरणात नाव गोवण्यासाठी प्रयत्न त्यांनी केले,पण असे वागून त्यांना आता घरी बसावे लागले असे रामराजेंवर टीकास्त्र सोडले,काय करणार जिवंत माणसाची खोड स्मशानभूमीत गेल्याशिवाय जात नाही असा श्रीमंत रामराजेंवर निशाणा साधला, आम्ही दोघे सुख दुःखात सुखात एकत्र राहिलो, खासदार दादा असते तर माझ्या जागी ते मंत्री असते असेही गोरे यांनी सांगितले,आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळ मुक्त झाल्याशिवाय राहणार नाही असे मंत्री जयकुमार गोरे यांनी स्पष्ट केले.