फलटण प्रतिनिधी – गेली एकोणीस दिवस झाले साखळी उपोषण सुरू आहे,मात्र याकडे प्रांताधिकारी असो किंवा इतर अधिकारी असो त्यांना आमच्याकडे लक्ष देण्यासाठी वेळ नाही त्यामुळे आता दोन दिवस संपूर्ण गाळे बंद ठेवण्यात येणार असल्याचे स्पष्ट करीत न्याय मिळाला नाहीतर फलटण बंद ठेऊ असा इशारा फलटण तालुका संघर्ष समितीचे अध्यक्ष ॲड.नरसिंह निकम यांनी सांगितले आहे.
ते कृषी उत्पन्न बाजार समिती फलटण च्या गाळा धारक यांचे साखळी उपोषण येथील अधिकारी ग्रहासमोर सुरू असून ऊन वारा पाऊस झेलत आज तब्बल एकोणीस दिवस झाले हे संविधानिक मार्गाने साखळी उपोषण सुरू असून त्याला आज एकोणीस दिवस झाले त्या पार्श्वभूमीवर त्यांनी आज पत्रकार परिषद आयोजित केली होती यावेळी ते बोलत होते यावेळी बोलताना ॲड.निकम यांनी सांगितले की तहसीलदार ते मुख्यमंत्री यांच्यापर्यंत आम्ही निवेदने दिली मात्र अद्यापही कोणता तोडगा निघाला नाही, तसेच ज्यांच्याकडे कोणताही तोडगा निघणार नाही त्याचं नाव आम्हाला सांगितले जाते परंतु ज्यांनी हा तोडगा काढायचाय त्यांनीच जाणून बुजून या आंदोलनाकडे पाठ फिरवली आहे. आता त्यामुळे दोन दिवस संपूर्ण गाळे बंद ठेवण्यात येणार आहेत त्याचबरोबर त्या नंतर या अन्यायाविरोधात संपूर्ण फलटण शहर बंद करण्यात येणार आहे असे ॲड.निकम यांनी सांगितले,ते सांगत आहेत की भाडेवाढ बरोबर आहे तर मग तुम्ही बायलॉज घेऊन या अन् दाखवा ते कसं बरोबर आहे ते पण तुम्हालाच कायदे माहिती नाहीत तर तुम्ही कसे पुढे येणार? जे भाडे आहे त्याला जीएसटी लागू नसताना तो घेतला जात आहे,संकलित कर भुई भाडे सबंधित बाजार समिती भरते इथ फलटण मध्ये मात्र गाळाधारक भरतात असे ही निकम यांनी स्पष्ट केले. फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीने गाळाधारक यांची चर्चेसाठी मीटिंग बोलावली अन् सह्या घेतल्या अन् त्यांनी नंतर प्रोसेडिंग लिहिले असा गौप्यस्फोट करीत त्या सह्या फसवून घेतल्या आहेत त्याच्या आम्ही तक्रारीही केल्या आहेत,तुम्ही कारखाना भाड्याने दिला तर एखाद्याने गाळा भाडेपट्ट्यावर दिला असेल तर त्याकडे दुर्लक्ष करा की असेही ॲड.नरसिंह निकम यांनी सांगितले यावेळी सर्व गाळाधारक उपस्थित होते.