फलटण प्रतिनिधी -फलटण शहरातील दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी दस्त नोंदणी करताना नागरिकांची अडवणूक करून अधिकचे पैसे उकळले जात असल्याची चर्चा फलटण मध्ये जोरात सुरू आहे. दस्त नोंदणीची अधिकृत फी शासनाने निश्चित केलेली असतानाही,त्यामध्ये जाणूनबुजून काहीतरी चुका काढल्या जात असून मध्यस्त्यांना सांगून लुटण्याचा गोरख धंदा फलटण मध्ये राजरोसपने सुरु आहे, तसेच इतर तालुक्यात संबंधित विभागाची कार्यालय असताना खटाव खंडाळा तसेच इतरही तालुक्यातील दस्त नोंदणीसाठी फलटण कार्यालयाची निवड केली जात असून त्या खरेदी खतात अनंत अडचणी असताना मात्र ते दस्त लाखो रुपये घेऊन केले जात आहेत. तसेच व्यवहार मंजूर करून घेण्यासाठी नागरिकांकडून जादा रक्कम घेतली जात असून त्या खरेदी खताची रेडी रेकणर प्रमाणे होणारी रक्कम ही कमी दाखवून शासनाची फसवणूक करीत स्वतःची झोळी मात्र दररोज लाखो रुपयांनी भरण्याचा सपाटा लावला जात आहे त्यामुळे संभधित अधिकाऱ्याची खातेनिहाय चौकशी करून त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. कोणत्याही शासनाचा अधिकारी वेळेत उपस्थित राहत नसताना हा अधिकारी मात्र बड्या विक्रेत्यांसाठी गुंठेवारी बंद असताना फलटण उपनगरातील हजारो दस्त करून देत दररोज गाडीभरून नोटा नेत असल्याचे अनेकजणांनी बोलून दाखविले तर संबंधित खरेदी खत करणाऱ्या काही बगल बच्चाणा बरोबर घेऊन कागदपत्रांची उलटापालट करून शासनाची व गोरगरिबांची फसवणूक करीत असल्याचा गैरप्रकार फलटणचा हा अधिकारी करीत असून त्याच्यामुळे अनेकांना कोट्यावधी रुपयांचा फायदा झाला व होत आहे परंतु त्याची तपासणी केल्यास ते दस्त रद्द होऊ शकतात यामुळे बडे धेंडे चुकीचे दस्त करून अक्षरशः फसवत आहेत. याशिवाय काही दस्त नोंदणीमध्ये प्रॉपर्टीचे व्हॅल्यूवेशन कमी दाखवून नोंदी केल्या जात असल्याची माहिती समोर येत असून, अशा प्रकरणांत लाखो रुपयांचे व्यवहार टेबलाखाली होत असल्याची चर्चा रंगली आहे. यामुळे शासनाला मोठ्या प्रमाणावर महसुली तोटा होत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या सर्व व्यवहारांमुळे दुय्यम निबंधक कार्यालयातील कारभार पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. नागरिकांत असंतोष वाढत असून, संबंधित प्रकरणांची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
चौकट – कोळकी व जाधववाडी (फ) तसेच एमआयडीसी परिसरातील दास्ताचा पंचनामा पुराव्याणीशी लवकरच त्यामध्ये फसवणूक करणारे राजकीय नेत्यांचे बागलबच्चे असून त्यांचं व एजंट अन संबंधित अधिकाऱ्यांचे पितळ उघडे होणार आहे तसेच प्राथमिक अंदाजानसून शासनाचा कोळकी मधील झालेल्या दास्तातून लाखो रुपयांचे नुकसान या बाबत भांडाफोड……