फलटण ~~ फलटण नगर परिषदेच्या प्रभाग रचनेवर घेण्यात आलेल्या सर्व हरकती फेटाळण्यात आल्या असून राज्यातील प्रभाग रचना अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे नगरपालिका निवडणुकीसाठी आरक्षण प्रक्रिया दिवाळीपूर्वीच जाहीर होण्याची शक्यता आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबला गेल्या होत्या मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर या निवडणुका तातडीने घेण्यासाठी निवडणूक आयोगाने कंबर कसली असून जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या गट व गण रचना तसेच महानगरपालिका नगरपालिकांच्या प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर करून त्यावर हरकती मागविण्यात आल्या होत्या बहुतांश हरकती फेटविण्यात आलेल्या आहेत. गट गण रचना संदर्भात अनेक जण न्यायालयात गेले होते मात्र न्यायालयाने अनेक निर्णय फेटाळले आहेत. नगरपालिका निवडणुकीसाठी निश्चित करण्यात आलेल्या प्रभाग रचनेवर अनेकानी हरकती घेतल्या होत्या मात्र त्यातील बहुतांश हरकती फेटाळण्यात आलेल्या आहेत फलटण नगरपालिकेच्या प्रभाग रचनेवर तब्बल 97 हरकती घेण्यात आल्या होत्या मात्र या सर्व हरकती फेटाळण्यात आल्या असून निवडणूक आयोग अंतिम प्रभाग रचना करण्याच्या मार्गावर आहे. फलटण नगरपालिकेसाठी तेरा प्रभाग निश्चित करण्यात आले असून यात बदल न झाल्याने इच्छुकांना आता प्रचारासाठी रणनीती आखता येणार आहे येत्या 15 ते 20 दिवसात प्रभाग रचनेनुसार आरक्षण जाहीर करण्यात येणार असल्याचे समजते त्यामुळे दिवाळीपूर्वीच आरक्षण निश्चित झाल्याने इच्छुक उमेदवारांना स्वतःच्या प्रचारासाठी चांगला वेळ देता येणार आहे. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या गट गण रचना निश्चित झाल्याने तेथेही आता आरक्षण कार्यक्रम कधी जाहीर होतोय याची उत्सुकता लागलेली आहे निवडणूक आयोग दिवाळीपूर्वीच जिल्हा परिषद व नगरपालिका निवडणुकांसाठी आरक्षण निश्चिती करेल असे समजते.