फलटण दिनांक 29 ( प्रतिनिधी ) फलटण तालुक्यातील ग्रामीण भागातील ग्रामस्थांना अनेक कामानिमित्त फलटण शहरात जावे लागत असते .फलटण शहर व ग्रामीण पोलिसांनी फलटण तालुक्यातील वडाप चां बंदोबस्त केल्याने वडाप बंद आहे . प्रवाशांना मात्र एस. टी. चाच आधार राहिला आहे.
त्यामुळे चार चार तास गाड्या ग्रामीण भागात न आल्याने एस टी प्रवासासाठी होतेय ससेहोलपट. फलटण आगारात मात्र कंट्रोल ला गाड्या ची नोंद असते मात्र ती गाडी च संबंधित ठिकाणी जात नाही तब्बल चार चार तास गाड्या ग्रामीण भागात जात नाहीत.त्यामुळे प्रवाशांना प्रतीक्षा करावी लागत आहे. सकाळी लवकर आलेल्या विद्यार्थी व प्रवाशांची तर दररोज च ससेहोलपट होताना दिसत आहे. या बाबत आगार प्रमुखांना माहिती विचारली असता त्यांनी रस्त्याचे कारण देत हा विषय सोडून दिला. फलटण तालुक्यातील आसू ,मुंजवडी, गुणवरे,साखरवाडी, गिरवी,आदी भागातील अनेक प्रवासी एस टी बस ने प्रवास करतात मात्र रेकॉर्ड ला नोंदअसते मात्र गाडीच प्रत्यक्ष रुटवर नाही .यामुळे पुन्हा एकदा फलटण आगाराचा अनागोंदी कारभार समोर येत आहे.
विद्यार्थी,महिला ,वृद्ध प्रवाशांची गर्दी मोठी असल्याने व एस टी ने प्रवास करणारी जनता ही गरीब असल्याने या विभागाकडे कोण लक्ष देत नाही, सर्वसामान्य नागरिकांची लालपरी असल्याने त्यामध्ये सामान्य जनता च प्रवास करीत असते . त्यातच नेहमीच सर्व विभाग चे अधिकारी व कर्मचारी हे सामान्य लोकांना किती सेवा देतात हा संशोधनाचा विषय आहे,त्यामुळे फलटण चा परिवहन विभाग तरी मागे कसा राहील जाणून बुजून सामान्य लोकांना त्रास देणे, कारण फलटण ला येणाऱ्या प्रत्येक गरीब प्रवाशाला एस टी शिवाय पर्याय नाही.त्यामुळे एस टी नोंद करायची कागदोपत्री पण मार्गावर न्यायची नाही असे प्रकार सुरू असून याला लगाम घालणार कोण? त्यातच एस टी आगारात प्रशासन व कर्मचारी यांच्या मध्ये सुद्धा कोणाला पाठीशी घालयच,अधिकाऱ्यांच्या जवळचा कोण त्याला अभय कसा द्यायचा हे आगारातील अधिकाऱ्यांना माहीत आहे.प्रवाशांची कितीही हेळसांड केली तरी सामान्य जनतेची बाजू कोण घेत नाही? हे माहित असल्याने जाणून बुजून त्रास देण्याचा प्रकार फलटण आगाराकडून सुरू आहे. महाराष्ट्र राज्य सरकारने प्रवाशांना अनेक सवलती दिल्या असल्याने अनेक प्रवासी दररोज प्रवास करतात त्यामध्ये महिलांचे प्रमाण जास्त असल्याने दररोज बस स्थानकांमध्ये महिलांच्या पैशावर ,दागिन्यांवर डल्ला मारण्याच्या घटना घडतात त्या कडे ही प्रशासन डोळेझाक करत आहे. फलटण तालुक्यातील ग्रामीण भागातील एस टी सेवा जर कोलमडली तर सामान्य जनतेचे हाल होतात त्या मुळे सामान्य जनतेच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी कटिबद्ध असणारे राजकीय पुढारी गप्प का असा सवाल ही या निमित्त होत आहे. पूर्वी फलटणच्या ग्रामीण भागात जाण्यासाठी पिवळ्या परमिट जीप असायच्या पण फलटण पोलिस स्टेशन च्या खडक नियमांमुळे हे वडाप बंद झाले .मात्र एसटी प्रशासन आविर्भावात च कारण वडाप बंद असल्याने प्रवास एस टी ने च करणार, कितीही आपण अडवणूक केली तरी फलटण तालुक्यातील प्रवाशांना एस टी शिवाय पर्याय नसल्याने हे अधिकारी जाणून बुजून असे निर्णय घेत आहेत का असाही सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे. त्या मुळे सामान्य माणसाच्या अत्यंत गरजेचा असणारा आणि महत्वाचा असणारा एस टी चा प्रश्न व कोलमडले ले वेळापत्रक दुरुस्त करण्याची मागणी प्रवाशांन मधून होत आहे.
चौकट. आमदार साहेब फलटणच्या सामान्य बहिणीना न्याय द्या? फलटण आगारामार्फत असणाऱ्या बस मधून हजारो महिला बसने प्रवास करतात.बस स्थानक प्रशासनाने कोलमडलेले वेळापत्रक ,त्यामुळे ग्रामीण भागातील महिलाना होणारा त्रास त्या च बरोबर महिलांचे दागिने चोरी च्या घटना यामुळे आमदार साहेब फलटणच्या महिला असुरक्षित आहेत? त्यामुळे आमदार साहेब तुम्ही तरी लाडक्या बहिणी साठी लक्ष देण्याची मागणी महिला प्रवाश्यांमधून होत आहे.